IPL Points Table : पंजाबला हरवलं तरी हैदराबादला 'ना नफा ना तोटा', पाहा पाईंट्स टेबलची स्थिती काय?

IPL Points Table Scenario : रोमांचक झालेल्या सामन्यात हैदराबादने (SRH vs PBKS) पंजाबचा धुव्वा उडवला. अखेरच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने खेळ खल्लास केला. हैदराबादच्या विजयानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये काय बदल झालेत? पाहुया...

सौरभ तळेकर | Updated: Apr 9, 2024, 11:46 PM IST
IPL Points Table : पंजाबला हरवलं तरी हैदराबादला 'ना नफा ना तोटा', पाहा पाईंट्स टेबलची स्थिती काय? title=
IPL Points Table Scenario PBKS vs SRH

SRH vs PBKS, IPL 2024 : पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (Punjab Kings vs Sunrisers Hyderabad) यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात हैदराबादने पंजाबचा केवळ 2 धावांनी खात्मा केला. शेवटच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने शशांक सिंग (Shashank Singh) आणि आशुतोष शर्मासमोर (Ashutosh Sharma) 29 धावा डिफेन्ड केल्या अन् पारडं हैदराबादच्या बाजूने झुकलं. 183 धावांचा पाठलाग करताना पंजाबला सुरूवातीला धक्के बसले पण पुन्हा एकदा 'नकोसा' शशांक सिंग पंजाबसाठी धावून आला. अशितोष शर्माने त्याला साथ दिल्याने पंजाबचा संघ सामन्यात परत आला. मात्र, शशांकच्या 46 धावांच्या खेळीनंतर देखील पंजाबला सामना गमवावा लागला. हैदराबादकडून भूवीने 2 गडी पटकावले. तर प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशाचा युवा खेळाडू नीतीश कुमार रेड्डी (Nitish Reddy) याने हैदराबादसाठी 37 बॉलमध्ये 64 धावांची खेळी केली. तर अब्दुल समदने 12 बॉलमध्ये 25 धावा कुटल्या. त्यानंतर शाहबाझ अहमदने 7 बॉलमध्ये 14 धावांची फिनिशिंग दिली. त्यामुळे हैदराबादला 182 धावा उभ्या करता आल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंगने 4 महत्त्वाच्या विकेट्स काढल्या. हैदराबादच्या या विजयानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table Scenario) मोठा उलटफेर झाला आहे. 

पाईंट्स टेबलचं गणित फिसकटलं?

राजस्थान रॉयल्सने पहिलं स्थान अजूनही सोडलं नाहीये. राजस्थानकडे 4 सामन्यातील 4 विजयासह 8 गुण आहेत. तर दुसऱ्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्सचा नंबर आहे. केकेआरकडे 6 गुण असून त्याचा नेट रनरेट 1.528 आहे. तसेच तिसऱ्या स्थानावर लखनऊचा संघ असून त्यांच्या खात्यात देखील 6 गुण आहेत. त्यानंतर कालच्या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानी कायम आहे. हैदराबादच्या विजयामुळे त्यांना धक्का लागला नाहीये. पाचव्या स्थानी मात्र हैदराबादने पाय रोवले आहेत. 6 अंक अन् 0.344 च्या नेट रनरेटसह हैदराबाद टॉप 5 मध्ये आहे. तर पराभवानंतर देखील पंजाबला मोठा धक्का बसला नाही. पंजाब अजूनही 6 व्या जागेवर आहे. पंजाबचा नेट रननेट -0.196 वर आहे.

पाईंट्स टेबलच्या खालच्या फळीवर लक्ष दिलं तर, गुजरात जाएन्ट्स अंकतालिकेत 7 व्या स्थानी आहे. पहिल्या विजयानंतर आता मुंबई इंडियन्स तळ सोडला असून मुंबईची टीम 8 व्या स्थानी आलीये. तर आरसीबीला सुर आवळल्याने आता आरसीबी 5 सामन्यातील 2 अंकासह 9 व्या स्थानी आहे. त्याचबरोबर दिल्लीची देखील तीच अवस्था पहायला मिळतेय. दिल्लीला 5 सामन्यात केवळ 1 विजय मिळवता आलाय. त्यात दिल्ली -1.370 नेट रनरेटसह 10 व्या स्थानावर आहे.

पंजाब किंग्जचा संघ - शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (W), आशुतोष शर्मा, सॅम करन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

सनरायझर्स हैदराबादचा संघ - ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.