Team India च्या विजयानंतर विराट कोहलीचा थेट अनुष्का शर्माला Video Call, चाहत्यांना दाखवली झलक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने 8 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारतीय संघाने 2 गडी गमवून गाठलं. 

Updated: Sep 29, 2022, 05:11 PM IST
Team India च्या विजयानंतर विराट कोहलीचा थेट अनुष्का शर्माला Video Call, चाहत्यांना दाखवली झलक title=

Virat Kohli on Video Call With Wife Anushka Sharma: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने 8 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर (India Vs SA) विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारतीय संघाने 2 गडी गमवून गाठलं. या विजयानंतर विराट कोहली (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सामना संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू बसमध्ये बसून हॉटेलमध्ये जात होते. या दरम्यान क्रिकेट चाहते रस्त्यावर गर्दी करून उभे होते. विराट कोहलीला विंडो सीटजवळ बसलेलं पाहून चाहते आनंदी झाले आणि जल्लोष करू लागले. कोहलीने चाहत्यांच्या शुभेच्छाही स्वीकारल्या. कोहलीने आपल्या मोबाईलची स्क्रीन चाहत्यांकडे वळवली, यामध्ये पत्नी अनुष्कासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये कोहलीची बॅट हवी तशी चालली नाही. विराट अवघ्या तीन धावा करून बाद झाला. विराट सध्या फॉर्ममध्ये असून 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आगामी सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. त्याने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये अर्धशतक झळकावले होते.