कृणाल पांड्याच्या लग्नातील अफलातून व्हिडिओ

मुंबई : पांड्या ब्रदर्सपैकी मोठा कृणाल पांड्या हा 27 डिसेंबर 2017 रोजी त्याची गर्लफ्रेंड पंखुडी शर्मासोबत विवाहबद्ध झाला.  विरूष्काच्या लग्नापाठोपाठ कृणालचं लग्न झालं. क्रृणाल आणि पंखुडीचा प्रेमविवाह झाला आहे. 'मी माझ्या चांगल्या मैत्रिणीसोबत लग्न करत आहे. पंखुडीचा माझ्या क्रिकेट खेळण्याला पूर्ण साथ आहे.' अशी माहिती क्रृणालने मुलाखतीदरम्यान दिली आहे.

कृणालच्या लग्नातील हार्दिक पांड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर हिट ठरला. कृणाल पांड्या आणि पंखुडीया शर्मा यांची ओळख कशी झाली. आणि या ओळखीचं रुपांतर मैत्री आणि प्रेमात कसं झालं याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. त्यांची ही लव्हस्टोरी या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. 'द वेडिंग स्टोरी' ने हा व्हिडिओ तयार केला आहे. 1 दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला 1 लाख 14 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. साडे चार हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडिओ पसंत केलं आहे. 

तसेच या दोघांचे प्री वेडिंगचे फोटो देशील सोशल मीडियावर पसंतीला पडले आहेत.