लोकेश राहुलपाठोपाठ ऋषभ पंतनंही शतक ठोकलं

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये भारतीय बॅट्समनना अखेर सूर गवसला आहे.

Updated: Sep 11, 2018, 08:28 PM IST
लोकेश राहुलपाठोपाठ ऋषभ पंतनंही शतक ठोकलं title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये भारतीय बॅट्समनना अखेर सूर गवसला आहे. लोकेश राहुलपाठोपाठ ऋषभ पंतनंही शतक झळकावलं आहे. पाचव्या दिवसाच्या चहापानापर्यंत लोकेश राहुल १४२ रनवर नाबाद तर ऋषभ पंत १०१ रनवर नाबाद खेळत आहे. चहापानापर्यंत भारताचा स्कोअर २९८-५ एवढा आहे. शेवटच्या सत्रामध्ये भारताला विजयासाठी १६६ रनची आवश्यकता आहे. त्यामुळे या मॅचची ड्रॉ होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे, असंच म्हणावं लागेल.

ऋषभ पंतचं टेस्ट क्रिकेटमधलं हे पहिलंच शतक आहे. ९५ रनवर असताना पंतनं सिक्स मारून त्याचं पहिलं शतक झळकावलं. याआधी टेस्ट क्रिकेटमधील पहिली रनही पंतनं सिक्स मारूनच केली होती.

आशिया खंडाबाहेर शतक करणारा ऋषभ पंत हा चौथा भारतीय विकेट कीपर ठरला आहे. याआधी १९५९ साली विजय मांजरेकर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ११८ रन, २००२ साली अजय रात्रानं वेस्ट इंडिजविरुद्ध ११५ नाबाद, २०१६ साली ऋद्धीमान सहानं वेस्ट इंडिजविरुद्ध १०४ रनची खेळी केली होती. 

इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचची ही सीरिज भारतानं याआधीच ३-१नं गमावली आहे. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा