बीसीसीआयच्या या निर्णयामुळे धोनीला झटका?

टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयकडून झटका बसण्याची शक्यता आहे.

Updated: Jan 4, 2018, 06:14 PM IST
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे धोनीला झटका? title=

मुंबई : टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयकडून झटका बसण्याची शक्यता आहे. बीसीसीआय खेळाडूंचा ए, बी आणि सी ग्रेड करार संपुष्टात आणण्याचा विचार करत आहे. या कराराऐवजी आता ए प्लस, ए, बी आणि सी अशाप्रकारे ग्रेडिंग करण्यात यायची शक्यता आहे.

या नव्या ग्रेडिंग प्रणालीमुळे टेस्ट, वनडे आणि टी-20 क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंबरोबर ए प्लस ग्रेडचा करार करण्यात येईल, असं बोललं जातंय. धोनी सध्या वनडे आणि टी-20 क्रिकेट खेळतो. तर अश्विन आणि जडेजाही सध्या टेस्ट टीमचाच हिस्सा आहेत.

बीसीसीआय प्रशासकांची समिती ही शिफारस बीसीसीआयच्या वित्त समितीला पाठवणार आहे. त्यानंतर या कराराबाबत निर्णय होईल. ३० नोव्हेंबरला भारताचा कॅप्टन विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआयच्या प्रशासकांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये खेळाडूंच्या मानधनाबाबत चर्चा झाली होती. या बैठकीनंतर समितीनं खेळाडूंच्या पगारवाढीला मान्यता दिली होती.