'रजनीकांंत'च्या अंदाजामध्ये एमएस धोनी घेऊन आला CSK चा प्रोमोशनल व्हिडिओ

दक्षिण चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार  रजनीकांत यांचे चाहते जागभरात पसरले आहेत.

Updated: Mar 29, 2018, 08:09 PM IST
'रजनीकांंत'च्या अंदाजामध्ये एमएस धोनी  घेऊन आला CSK चा प्रोमोशनल व्हिडिओ title=

मुंबई : दक्षिण चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार  रजनीकांत यांचे चाहते जागभरात पसरले आहेत. देवाप्रमाणे चाहते त्यांची पूजा करतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टकडे चाहत्यांचे खास लक्ष असते. लवकरच 'काला' या चित्रपटातून रजनीकांत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याची अनेक व्हर्जन्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. मात्र चैन्नई सुपरकिंग इतके सुपरहिट काहीच नाही.  

7 एप्रिलपासून रंगणार आयपीएल  

टी20 चा महाकुंभ समजल्या जाणार्‍या आयपीएलचे यंदाचे 11 वे पर्व आहे. 7 एप्रिलपासून आयपीएल रंगणार आहे. मात्र त्याआधी खेळाडूंसोबत या सीझनचा चैन्नई सुपर किंगचा खास प्रोमोशनल व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला आहे. 

कालासोबत मॅश अप व्हिडिओ  

रजनीकांत यांच्या 'काला' चित्रपटासोबत चैन्नई सुपर किंगने खास मॅशअप व्हिडिओ शूट केला आहे. हरभजनसिंग नाना पाटेकरांच्या डायलॉगवर या व्हिडिओची सुरूवात करतो. त्यानंतर मुरली विजय, ब्रावो हे खेळाडू प्रोमोमध्ये दिसत आहे. यंदा  हरभजन सिंंह पहिल्यांंदा चैन्नई सुपरकिंंगच्या संघातून खेळणार आहे.  

 

'काला' पुढील महिन्यात चाहत्यांच्या भेटीला  

आयपीएल 7 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर 27 एप्रिलला 'काला' हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तामिळनाडूत हे दोन्ही ट्रेन्ड एकदम जमून आल्याने चाहत्यांना दबल ट्रीट मिळणार आहे. 

 

राजनाथांचे दिग्दर्शन 

काला या चित्रपटात रजनीकांत प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पी. राजनाथ यांचे आहे, तर धनुषच्या Wunder Bar Films ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात इश्वरी राव, ह्युमा कुरेशी प्रमुख भूमिकेत आहे. तर चित्रपटाला संगीत दिग्दर्शन संतोष नारायणन  यांचे आहे.