चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! MS Dhoni या आजाराने त्रस्त

महेंद्रसिंह धोनी सध्या या आजारावर वैद्यांकडून उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे

Updated: Jul 1, 2022, 06:22 PM IST
चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! MS Dhoni या आजाराने त्रस्त title=

मुंबई : चेन्नई किंवा भारतच नाही तर संपूर्ण जगात आपल्या फलंदाजीमुळे लाडका असलेला धोनी म्हणजेच माही सध्या फिट नसल्याची माहिती मिळाली आहे. महेंद्रसिंह धोनीवर सध्या उपचार सुरू आहेत. 

क्रिकेट स्टार महेंद्रसिंग धोनी आजकाल गुडघेदुखीने त्रस्त आहे आणि तो रांचीच्या एका दुर्गम गावात झाडाखाली बसलेल्या रूग्णांना भेटणाऱ्या डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. आयपीएलनंतर प्रसिद्धीपासून दूर असलेला धोनी आता त्याच्या एका समस्येमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

धोनी कोणत्या गोळ्या घेण्यापेक्षा सध्या पारंपरिक पद्धतीनं आयुर्वेदिक पद्धतीनं गुडघ्यावर उपचार करण्यावर भर देत आहे. औषधी वनस्पतींच्या मदतीने उपचार करणारे वैद्य बंधन सिंग खरवार सांगतात की, प्रत्येक रुग्णाप्रमाणे ते औषधाच्या एका डोससाठी धोनीकडून 40 रुपये घेतात. 

वैद्य बंधन सिंग खरवार हे रांचीपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या लापुंग पोलीस स्टेशन परिसरातील कटिंगकेला इथे गेल्या 28 वर्षांपासून झाडाखाली ताडपत्री तंबू लावून अनेक आजारांवर उपचार करत आहेत.

गेल्या महिन्यात चार दिवसाच्या अंतराने धोनीने औषधं उपचार घेत असल्याचं सांगितलं. हे वैद्य हाडांसाठी औषधी वनस्पतीपासून औषधं देत असल्याची माहिती मिळाली आहे. औषधं घरी घेऊन जाण्याची परवानगी नाही.

धोनीपूर्वी त्याच्या पालकांनी या डॉक्टरांकडून उपचार घेतले होते. त्याला आराम मिळाल्यावर धोनीही तिथे पोहोचला. वैद्य बंधन सिंग खेरवार म्हणाले की, मी सुरुवातीला धोनीच्या आई-वडिलांना ओळखू शकलो नाही किंवा धोनीला ओळखू शकलो नाही.

वैद्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता दर चार दिवसांनी धोनीच्या इथे येण्याची बातमी येताच त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. म्हणूनच आता तो गावात पोहोचतो आणि गाडीत बसतो, जिथे त्याला औषधाचा डोस दिला जातो. गेल्या महिनाभरात गावातील अनेकांनी त्याच्यासोबत फोटो काढले आहेत.