अजिंक्य रहाणेवर निवड समिती नाराज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेनं उत्कृष्ट कामगिरी केली.

Updated: Oct 11, 2017, 10:45 PM IST
अजिंक्य रहाणेवर निवड समिती नाराज  title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेनं उत्कृष्ट कामगिरी केली. ५ मॅचच्या या सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेनं लागोपाठ ४ अर्धशतकं झळकावली. या कामगिरीनंतरही अजिंक्य रहाणेला टी-20 सीरिजमध्ये डच्चू देण्यात आला. यानंतर रहाणे त्याची पत्नी राधिकासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. राधिका आणि अजिंक्य सेशल्समध्ये गेले आहेत.

२०१७-१८च्या रणजी मोसमाला सुरुवात झाली असताना अजिंक्य रहाणे मात्र सुट्टीवर आहे. १४ ऑक्टोबरला मुंबईचा सामना मध्य प्रदेशशी होणार आहे. पण अजिंक्य रहाणेनं या मॅचसाठी आपण उपलब्ध नसल्याचं मुंबईच्या निवड समितीला कळवलं आहे. अजिंक्यच्या या निर्णयामुळे निवड समिती नाराज झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजिंक्य रहाणेच्या या निर्णयाबाबत निवड समितीनं आश्चर्यही व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. 

 

Radhika & #AjinkyaRahane take a chopper ride in #Seychelles.

A post shared by Circle of Cricket (@circleofcricket) on