'कपील देव बनायचं नाही, हार्दिक पांड्याच राहू द्या'

हार्दिक पांड्याच्या वादळी बॉलिंगमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत मजबूत स्थितीमद्ये पोहोचला आहे. 

Updated: Aug 20, 2018, 08:34 PM IST
'कपील देव बनायचं नाही, हार्दिक पांड्याच राहू द्या' title=

नॉटिंगहम : हार्दिक पांड्याच्या वादळी बॉलिंगमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत मजबूत स्थितीमद्ये पोहोचला आहे. हार्दिक पंड्यानं ६ ओव्हरमध्ये २८ रन देऊन इंग्लंडच्या ५ विकेट घेतल्या. यामुळे पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडची टीम १६१ रनवर ऑल आऊट झाली आणि भारताला १६८ रनची आघाडी मिळाली. हार्दिकनं टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच इनिंगमध्ये ५ विकेट घेतल्या.

हार्दिकच्या या कामगिरीनंतर त्याची तुलना परत कपील देव यांच्याशी व्हायला लागली. पण मला कपील देव बनायचं नाही,  हार्दिक पांड्याच राहू द्या, अशी प्रतिक्रिया पांड्यानं दिली आहे. मला कपिल देव बनायचं नाही. मी स्वत:च्या ओळखीमुळेच खुश आहे, असं वक्तव्य पांड्यानं केलं आहे.

मी आत्तापर्यंत ४० वनडे आणि १० टेस्ट मॅच खेळल्या आहेत, आणि मी हार्दिकच आहे कपील नाही. त्या काळामध्ये अनेक दिग्गज होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर माझी तुलना करू नका, असं आवाहन पांड्यानं केलं.

टीका करणाऱ्यांनाही पांड्यानं प्रत्युत्तर दिलं आहे. मी त्यांच्यासाठी खेळत नाही. त्यांना अशा गोष्टी बोलण्याचे पैसे मिळतात. त्याची मला परवा नाही. मी देशासाठी खेळतो. मी बरोबर खेळत आहे आणि माझी टीम माझ्यावर खुश आहे त्यामुळे दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला मी महत्त्व देत नाही, असं पांड्या म्हणाला.