Olympic gold : सिंगल की मिंगल, खुद्द नीरजनंच सांगितलं त्याचं रिलेशनशिप स्टेटस

अंत भला तो सब बला, हे नीरजसाठी लागू होतं...   

Updated: Aug 10, 2021, 07:11 PM IST
Olympic gold : सिंगल की मिंगल, खुद्द नीरजनंच सांगितलं त्याचं रिलेशनशिप स्टेटस   title=
नीरज चोप्रा

Olympic gold : यंदाच्या वर्षी भारतीय खेळाडूंच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीनं साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. क्रीडा जगतामध्ये भारतीय खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली. ऑलिम्पिकमध्ये देशाच्या वाट्याला सुवर्ण पदक आणण्याचं स्वप्नही भालाफेक खेळाडू (Javelin thrower) नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं पूर्ण केलं. 

ऑलिम्पिकच्या अगदी अखेरीस नीरजनं केलेली ही सुवर्णमयी कामगिरी देशाची मान उंचावून गेली. त्यामुळं 'अंत भला तो सब भला', अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. देशाला अॅथलॅटिक्समध्ये सुवर्णपद मिळवून देणारा तो पहिला खेळाडू ठरला आणि हा विक्रम त्याच्या नावे नोंदवला गेला. नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतर वैयक्तिक स्तरावर ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक पटकावणारा तो देशातील दिसरा खेळाडू ठरला. 

सोशल मीडिया, प्रसारमाध्यमं, गल्ली बोळ आणि घराघरात नीरजच्याच नावाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरही त्याच्या फॉलोअर्सच्या आकड्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. इतकंच नव्हे, तर नीरजचा अनोखा अंदाज पाहता अनेक फिमेल फॅन्सवरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेकजणी त्याच्याबद्दलची माहिती सर्च करत आहेत. यामध्ये त्याच्या खासगी जीवनात डोकावत नीरजच्या जीवनात कुणी 'ती' आहे का, त्याचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे (relationship status), याचविषयी अनेकांना कुतूहल असल्याचं कळत आहे. 

नीरज सिंगलच आहे, पण... 
नीरज चोप्रानंच आपण सिंगल आहोत, की मिंगल याबाबतच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आपण सिंगलच आहोत, पण असं असलं तरीही येत्या काही वर्षांमध्ये तरी किमान खेळावरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचं त्यानं अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळं, Girls, Better luck next time. 

शाहरुख खान की इशांत हेअर स्टाईलची प्रेरणा कोणाकडून घेतली? त्यावर गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्रा म्हणतो...

 

प्रेयसीबाबतचा प्रश्न विचारताच नीरज म्हणाला... 
'हे सर्व पाहू नंतर, सध्यातरी माझं लक्ष खेळावरच आहे. माझ्या आयुष्यात आताच्या घडीला कुणीही नाही. मला तुम्हा सर्वांचं प्रेम मिळतंय ही खूप मोठी गोष्ट आहे. येत्या काळात आशियाई खेळ, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि त्यानंतर पुन्हा एकदा काही स्पर्धा आणि पुढे ऑलिम्पिक असं एकंदर लक्ष्य आहे. त्यामुळे मला माझ्या खेळावरच एकाग्र राहायचं आहे.'