पाकिस्तानच्या कॅप्टनची लाजीरवाणं कृत्य, टीमला मिळाली मोठी शिक्षा

कॅप्टनची एक चूक टीमसाठी पडली महागात, अंपायरकडून मोठी शिक्षा पाहा नेमकं काय घडलं

Updated: Jun 11, 2022, 02:20 PM IST
पाकिस्तानच्या कॅप्टनची लाजीरवाणं कृत्य, टीमला मिळाली मोठी शिक्षा title=

मुंबई : कॅप्टनची एक चूक संपूर्ण टीमसाठी महागात पडली आहे. कॅप्टनने लाजीरवाणं कृत्य केलं आणि त्याचा मोठा फटका टीमला बसला आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज तीन सामन्यांची वन डे सीरिज सुरू आहे. पाकिस्तानने दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 120 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. 

ह्या सामन्याचा निकाल पाकिस्तानच्या बाजूनं असला तरी टीमचा कर्णधार बाबर आझमच्या टीमला मोठा फटका सहन करावा लागला. यामध्ये खरंतर चूक बाबर आझमची होती. 

टी 20 सामन्यात बाबर आझमने क्रिकेटच्या नियमाचं उल्लंघन केलं. वेस्ट इंडिजच्या 29 व्या ओव्हरमध्ये बाबर आझमने विकेटच्या मागून थ्रो पकडताना कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर अंपायरने बाबर आझमला ग्लव्स काढायला लावले. तर शिक्षा म्हणून त्यांना 5 रन द्यायला लावले. बाबरच्या या चुकीमुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं आहे.             

विकेटकीपरशिवाय दुसरा कोणताही खेळाडू ग्लव्स घालू शकत नाही. या नियमाचं उल्लंघन करण्यात आलं. 28.1 च्या नियमाचं उल्लंघन केल्यानं बाबार आझमसह टीमला अंपायरने शिक्षा दिली. वेस्ट इंडिज पहिलाच सामना 120 धावांनी पराभूत झाले. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात मोठ्या धावसंख्येनं विजय मिळवता आला.