पाकिस्तान सुपर लीगमध्ये लज्जास्पद कृत्य, खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या, Video व्हायरल

क्रिकेट हा खरंच 'जंटलमेन गेम' राहिला आहे का? क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केला संताप  

Updated: Feb 16, 2022, 02:55 PM IST
पाकिस्तान सुपर लीगमध्ये लज्जास्पद कृत्य, खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या, Video व्हायरल title=

Pakistan Super League : पाकिस्तान सुपर लीग आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. प्ले ऑफ गाठण्यासाठी प्रत्येक संघ जोमाने खेळतोय, पण या लीगमध्ये क्रिकेट जगताची मान शरमेनं खाली जाईल असं कृत्य खेळाडूंकडून घडलंय. खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्याचं पाहिला मिळतंय. या घचनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

सुपर लीगमधल्या एका सामन्यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर आणि ऑस्ट्रेलियाचा खेळाडू बेन कटिंग यांच्या तू तू मै मै झालं. क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंनी एकमेकांना टोमणे मारणं किंवा एकमेकांच्या अंगावर धावून जाणं हे सर्रास पाहिला मिळतं. पण या दोन्ही खेळाडूंनी सर्व मर्यादा पार करत एकमेकांना अश्लिल हावभाव केले.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स सामन्यादरम्यान  सोहेल तन्वीर आणि बेन कटिंग यांनी एकमेकांना पाहून मिडल फिंगर दाखवलं. ज्याचा व्हिडिओ चर्चेत आहे.

नेमकं काय घडलं?
या वादाची सुरुवा बेन कटिंगने केली. बेन कटिंगने तन्वीरच्या एकाच ओव्हरमध्ये ४ सिक्स लगावले, त्यानंतर त्याने तन्वीर डिवचण्यासाठी मिडल फिंगर दाखवलं. यानंतर बेन कटिंग आणि तन्वीरमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. त्याच ओव्हरमध्ये बेन कटिंग झेलबाद झाला आणि याचा बदला तन्वीरने घेतला. तन्वीरनेही तसंच कृत्य करत मिडल फिंगर दाखवला.

कटिंग आणि तनवीरमध्ये जुना वाद
सोहेल तनवीर आणि बेन कटिंग यांच्यातील हा वाद नवा नाही, या आधी दोन्ही खेळाडूंमध्ये 2018 साली वाद झाला होता. सीपीएलमधल्या एका सामन्यात बेन कटिंगला बाद झाल्यानंतर तन्वीरने त्याच्याकडे पाहून अपमानास्पद हावभाव केले होते, त्याचा बदला ४ वर्षांनंतर बेन कटिंगने घेतला. पण खेळाडूंच्या या अश्लील कृत्याने क्रिकेट हा खरंच जंटलमेन गेम राहिला आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांना यावर संताप व्यक्त केला आहे.