परिणीतीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला हार्दिक पांड्या

क्रिकेट आणि बॉलीवूडचे कनेक्शन फार जुने आहे. काही कहाण्या पूर्ण झाल्या तर काही फक्त चर्चेपुरत्याच मर्यादित राहिल्या. युवराज सिंह आणि हेझल कीच, हरभजन सिंग आणि गीता बसरा या जोड्या लग्नबंधनात अडकल्या तर लवकरच झहीर खान आणि सागरिक लग्नाच्या बेडीत अडकतायत. 

Updated: Sep 3, 2017, 09:14 PM IST
परिणीतीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला हार्दिक पांड्या title=

मुंबई : क्रिकेट आणि बॉलीवूडचे कनेक्शन फार जुने आहे. काही कहाण्या पूर्ण झाल्या तर काही फक्त चर्चेपुरत्याच मर्यादित राहिल्या. युवराज सिंह आणि हेझल कीच, हरभजन सिंग आणि गीता बसरा या जोड्या लग्नबंधनात अडकल्या तर लवकरच झहीर खान आणि सागरिक लग्नाच्या बेडीत अडकतायत. 

हीच परंपरा टीम इंडियाचे नवे खेळाडू पुढे चालवत असल्याचे दिसतेय. यात सर्वात आधी नाव आलेय ते हार्दिक पंड्याचे. हार्दिक पांड्या प्रेमाच्या मैदानावत षटकार लगावण्याच्या तयारीत दिसतोय. पांड्याच्या हृद्यात अभिनेत्री परिणीती चोप्रासाठी खास जागा आहे. असं आम्ही म्हणत नाही आहोत तर त्यांच्या दोघांच्या ट्विटवरुन हे दिसतंय.

परिणीतीने नुकताच एका सायकलचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. हा फोटो शेअर करताना  The perfect trip with the most amazing partner  Love is in the air!!! असं तिने म्हटलंय.

पांड्याने या ट्विटला उत्तर देताना म्हटलंय, मी अंदाज वर्तवू शकतो का? असं वाटतंय की ही बॉलीवूड आणि क्रिकेट लिंक आहे. बाय द वे चांगला क्लिक आहे. 

याला परिणीतीनेही उत्तर दिलंय. Hahaha. Maybe. Maybe not. All I can say is that the clue is in the pic itself!!!

या टिवटिवदरम्यान एका युझर्सने हार्दिकला मोलाचा सल्ला दिलाय. लड़का हिरोइन पर लट्टू हो चुका है, खेल पर ध्यान दे भाई, असं एका यूझर्सने म्हटलंय.