या ऑलराऊंडर खेळाडूच्या खांद्यावर कसोटी फॉरमॅटसाठी टीमची जबाबदारी

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात मोठा बदल, हा ऑलराऊंडर खेळाडू कसोटीसाठी टीमचा कर्णधार

Updated: Nov 26, 2021, 02:07 PM IST
या ऑलराऊंडर खेळाडूच्या खांद्यावर कसोटी फॉरमॅटसाठी टीमची जबाबदारी title=

सिडनी: गेल्या 65 वर्षांत जे घडलं नाही ते आज घडलं आहे. क्रीडा विश्वातून सर्वात मोठी बातमी आहे. ऑलराऊंडर क्रिकेटपटवर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियाच्या नवीन कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. 

आठवडाभरापूर्वी टिम पेनने जुन्या वादामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथची ब्रिस्बेनमधील गाबा इथे ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा नवीन कसोटी उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. कमिन्स यापूर्वी टीम पेनच्या नेतृत्वाखाली उपकर्णधाराची भूमिका बजावत होता.

पॅट कमिन्स एक उत्तम खेळाडू आहे. इतकच नाही तर तो मैदानाबाहेर टीममधील इतर सदस्यांचा तेवढाच चांगला मित्र आहे. त्यामुळे पॅट कमिन्स ही जबाबदारी खूप उत्तम पद्धतीनं पार पाडू शकतो असा ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डला विश्वास आहे. 

स्मिथ म्हणाला, 'आम्ही चांगले मित्रही आहोत. एक संघ म्हणून आम्हाला क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करायची आहे आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्यायचा आहे. कसोटी कर्णधार म्हणून कमिन्स 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऍशेस मालिकेत संघाचे नेतृत्व करेल.