Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत चमकला हा स्टार खेळाडू

आज अहमदाबादमध्ये रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात आणखी एका खेळाडूने आपल्या कामगिरीने सगळ्यांनाच प्रभावित केले आहे.

Updated: Feb 9, 2022, 09:49 PM IST
Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत चमकला हा स्टार खेळाडू title=

अहमदाबाद : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (Ind vs WI) यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दुसरा सामना जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. (Prasidh krishna takes 4 wickets) 

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित षटकात 9 गडी गमावून 237 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला 50 षटकात 238 धावांची गरज होती. पण वेस्ट इंडिजचा संघ 193 वर ऑलआऊट झाला.

भारतासाठी आज युवा क्रिकेटर प्रसिद्ध कृष्णा याने जबरदस्त कामगिरी केली. त्याने 9 ओव्हरमध्ये 12 रन देत 4 विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरने 42 रन देत 2 विकेट घेतल्या तर दीपक हुड्डाने करिअरमधली पहिली विकेट घेतली.

प्रसिद्ध कृष्णाने वेस्ट इंडिजच्या सर्व महत्त्वाच्या खेळाडूंना पव्हेलियनमध्ये पाठवले. भारतीय संघात आणखी एक नवा स्टार पुढे आला आहे.

रोहित शर्मा फक्त 5 रनवर आऊट झाल्यानंतर पंत आणि विराट कोहली देखील प्रत्येक 18 रनवर आऊट झाले. त्यानंतर केएल राहुलने आणि सुर्यकुमार यादवने इनिंग सांभाळली. केएलने 49 तर सुर्यकुमारने 64 रनची खेळी खेळली. वॉशिंग्टन सुंदरने 24 रन केले. दीपक हुड्डाने 29, शार्दुलने 8, सिराजने 3 तर चहलने 11 रन केले.

वेस्ट इंडिजसाठी ब्रुक्सने 44 रनची खेळी केली. होपने 27, होसेईनने 34 रन केले. तर स्मिथने 24 रन केले. इतर कोणताही खेळाडू मोठी खेळी खेळू शकला नाही.