हिटमॅन रोहितला रवी शास्त्रीने ठेवले नवे नाव

हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित यापूढे नव्या नावाने ओळखला जाणार आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 14, 2017, 04:58 PM IST
 हिटमॅन रोहितला रवी शास्त्रीने ठेवले नवे नाव  title=

नवी दिल्ली : हिटमॅन रोहित शर्माने श्रीलंकेविरूद्ध २०८ धावांची खेळी करत क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला. या खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या पराभवाचा वचपा काढला. तिसरे द्विशतक ठोकणारा रोहित पहिला फलंदाज ठरलाय. 

शतकांची हॅटट्रिक

रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुहेरी शतकाची हॅटट्रिक आहे. श्रीलंकेविरुद्धचे त्याचे हे दुसरे शतक आहे. रोहितने १५३ धावांत नाबाद २०८ धावा चोपल्या.

हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित यापूढे नव्या नावाने ओळखला जाणार आहे. 

सर्वाधिक स्कोअर 

रोहितचा वनडेतील सर्वाधिक स्कोर २६४ आहे. श्रीलंकेविरुद्ध २०१४मध्ये त्याने ही धावसंख्या उभारली होती. याशिवाय २०१३मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकातामध्ये २०९ धावा ठोकल्या होत्या. 

कुठली रेटींग ?

मॅच नंतर भारतीय क्रिकेट कोच रवि शास्त्री यांनी रोहितला विचारले, "तीन डबल सेंच्युरीमध्ये या डबल सेंच्युरीला कुठली रेटींग देशील ?" 

"कोणती एक चांगली सांगण माझ्यासाठी कठीण असेल. तिघांचेही महत्त्व माझ्यासाठी खास आहे. कठीण वेळात मी डबल सेंच्युरी मारली आहे." असे उत्तर रोहितने दिले. 

'रोहित पैसा वसूल शर्मा'

आज तुम्ही आमच्यासाठी रोहित पैसा वसूल शर्मा आहात असे म्हणत रवी शास्त्री यांनी त्याला शुभेच्छा दिल्या