Rishabh Pant: हातात काठी चेहऱ्यावर वेदना, तरीही झुंजतोय ऋषभ पंत; नवा Video पाहिलात का?

Rishabh Pant Recovery Video: काही आठवड्यापूर्वीच ऋषभने स्वत:चा कुबड्या घेऊन चालतानाचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला होता. अशातच आता ऋषभ पंतचा नवा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.

Updated: Jun 30, 2023, 04:04 PM IST
Rishabh Pant: हातात काठी चेहऱ्यावर वेदना, तरीही झुंजतोय ऋषभ पंत; नवा Video पाहिलात का? title=
Rishabh Pant Recovery Video

Rishabh Pant Viral Video: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) मागील वर्षाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेल्या एका भीषण कार अपघातामध्ये (Rishabh Pant Accident) जखमी झाला. त्यानंतर त्याच्यावर अनेक उपचार केले गेले. अनेक सर्जरी देखील झाल्या होत्या. त्यानंतर आता ऋषभ पंत पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय.काही आठवड्यापूर्वीच ऋषभने स्वत:चा कुबड्या घेऊन चालतानाचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला होता. अशातच आता ऋषभ पंतचा नवा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.

ऋषभ पंत वेळोवेळी त्याच्या पुनरागमनाचे अपडेट्स सोशल मीडियावर देत आहे. ज्यावरून तो खूप वेगाने बरा होत असल्याचं दिसतंय. ऋषभ पंतचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील (NCA) एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत गुडघ्याचा व्यायाम करताना दिसत आहे. व्यायामादरम्यान त्याला खूप वेदना होत असल्याचंही दिसून येतंय. ऋषभच्या चेहऱ्यावर वेदना दिसत असल्याने त्याच्या चाहते देखील नाराज झाल्याचं दिसतंय.

आणखी वाचा - Rishabh Pant: ऋषभ पंतने अचानक बदलली जन्मतारीख; नेमकं कारण काय?

दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतचा व्हिडिओ (Rishabh Pant Video) शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो पुनर्वसनावर काम करताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत, माझ्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. मी आता माझ्या आयुष्याचा पुरेपुर आनंद घेऊ इच्छितो. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन मिळवण्यासाठी कठोर मेहनत करण्याची माझी तयारी आहे, असं ऋषभ पंत म्हणाला होता.

पाहा Video

दरम्यान, दोन दिवसापूर्वी ऋषभ पंतने त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवर (Rishabh Pant Instragram) दुसरी जन्मतारीख शेअर केली होती. ऋषभ पंतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे बायो बदलताना महत्त्वाची तारीख नमुद केली, 'दुसरी जन्मतारीख - 5 जानेवारी 2023', असं ऋषभ पंतने लिहिलं आहे. अनेक शस्त्रक्रिया झाल्यानंतर ऋषभ पंत एनसीएमध्ये पुनर्वसन करत आहे. जणू काही त्याचा नवीन पुनर्जन्म झालाय. आगामी वर्ल्ड कपपूर्वी ऋषभ पंत टीम इंडियात जागा बनवेल, अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली आहे.