यूएस ओपनः रोजर फेडररकडून भारताच्या सुमित नागल पराभूत

पहिला सेट जिंकत त्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता...

Updated: Aug 27, 2019, 04:44 PM IST
यूएस ओपनः रोजर फेडररकडून भारताच्या सुमित नागल पराभूत title=

न्यूयॉर्क: न्यूयॉर्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या ग्रॅन्ड स्लॅम टुर्नामेंटमध्ये भारताचा टेनिसपटू सुमित नागल अपयशी ठरला. या मॅचला रोजर फेडररने ४-६,६-१, ६-२, ६-४ ने विजय मिळवला. तर, मॅचच्या पहिल्या सेटमध्ये सुमितने उत्कृष्ठ प्रदर्शन दाखवत फेडररचा ६-४ ने पराभूत केले होते. परंतू दुसऱ्या सेटमध्ये फेडररने वापसी करत ६-१ ने सेट त्याच्या नावावर केला.

क्वालीफाइंगच्या द्वारे यूएस ओपनमध्ये मुख्य ड्रॉ मध्ये जागा बनवणाऱ्या नागलला फक्त ५८ हजार डॉलर निधी मिळणार आहे. परंतू या मॅचमध्ये त्याला जो अनुभव मिळाला तो त्याला खूप कामात येईल. मॅच नंतर फेडरर म्हणाला की, 'हा सेट माझ्यासाठी खूप कठीण होता. त्याने उत्कृष्ठ प्रदर्शन केले आणि याचे सगळे श्रेय त्याला जाते. माझ्याकडून अनेक बॉल चुकले आणि मी चुका होऊ नये याकडे लक्ष दिले. आशा आहे की, मी पुढे चांगले प्रदर्शन करेल.' फेडररला विचारण्यात आले की, त्याला कुठे वाटले की तो नागल नाहीतर नडालच्या विरोधात खेळत आहे. कारण दोघांच्या नावात फक्त डी आणि जी चा फरक आहे. त्यावर तो म्हणाला की, 'नाही हे फक्त तुमच्या आणि सोशल मीडियासाठी आहे.'

मॅचमध्ये फेडररची सुरवात चांगली झाली नाही. पण नागलने चांगली सुरवात केली. पहिला सेट जिंकून सगळ्या प्रेक्षकांना त्यांनी हैराण केलं. त्याने तीसऱ्या गेममध्ये फेडररच्या डबल फास्टचा फायदा घेत ब्रेक प्वाइंट घेतला. फेडरर जेव्हा एटीपी रॅंकिंगमध्ये १९० व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूला समजण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा नागलने त्याच्या रिटर्न आणि फोरहॅंडने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 

जो पर्यंत फेडरर आणि दर्शक काही समजू शकतील तोपर्यंत नागलने दुसऱ्यावेळेस त्याची सर्विस तोडली. त्यानंतर ०-३० स्कोर झाल्यावर फेडररने त्याची सर्विस सांभाळली. नागलने त्याच्या चागल्या शॉर्टसने फेडररला नेटजवळ येण्याची संधी दिली नाही. त्यादरम्यान फेडरर त्याच्या चुकांना सुधारण्याचे प्रयत्न करत होता. फेडररने पहिल्या सेटमध्ये १९ चुका केल्या आणि नागलने फक्त ९ चुका केल्या.