हुश्श! रोहितनं मोडलं स्वत:चंच लाजिरवाणं रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेमधल्या रोहित शर्माच्या कामगिरीवरून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती.

Updated: Feb 13, 2018, 05:43 PM IST
हुश्श! रोहितनं मोडलं स्वत:चंच लाजिरवाणं रेकॉर्ड title=

पोर्ट एलिजाबेथ : दक्षिण आफ्रिकेमधल्या रोहित शर्माच्या कामगिरीवरून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं झळकावणाऱ्या रोहितचं दक्षिण आफ्रिकेच्या मैदानातली कामगिरी खराब आहे. पण पाचव्या वनडेमध्ये रोहितनं त्याच्या दक्षिण आफ्रिकेतल्या वनडे क्रिकेटमधल्या सर्वात कमी स्कोअरला पिछाडीवर टाकलं आहे. याआधी रोहित शर्माचा दक्षिण आफ्रिकेतला सर्वाधिक स्कोअर २३ रन्स होता.

तिसऱ्या वनडेमध्ये शून्य रनवर आऊट झालेला रोहित चौथ्या वनडेमध्ये ५ रन्सवर आऊट झाला होता. चौथ्या मॅचमध्ये कागिसो रबाडानं रोहित शर्माला आऊट केलं. या सीरिजमध्ये रबाडानं रोहितची तिसऱ्यांदा विकेट घेतली. तर एका मॅचमध्ये मॉर्नी मॉर्कलनं रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

वनडे कारकिर्दीमध्ये रोहित शर्मा १२ वेळा शून्यवर आऊट झाला आहे. याआधी ज्या ११ मॅचमध्ये तो शून्यवर आऊट झाला त्यापैकी ५ मॅचमध्ये भारताचा विजय तर ५ मॅचमध्ये पराभव झाला. एका मॅचचा निकाल लागला नाही.

रोहितनं मागच्या ११ इनिंगमध्ये ११.४५च्या सरासरीनं १२६ रन्स बनवले आहेत. या ११ इनिंगमध्ये रोहितचा स्कोअर ११, ९, २३, १, ५, १८, १९, २०, १५, ०, ५ असा आहे.