'माझं काय? माझं तर हे शेवटचं...' रोहितच्या 'त्या' व्हिडीओमुळे एकच खळबळ

IPL 2024 मध्ये रोहित शर्माला मुंबई इंडियन्सची कॅप्टन पदावरुन हटवून हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली. यानंतर जे झालं ते क्रिकेट चाहत्यांना माहितच आहे. हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यापासून रोहित आणि MI च्या चाहत्यांची नाराजी पत्करावी लागत आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 11, 2024, 12:58 PM IST
'माझं काय? माझं तर हे शेवटचं...' रोहितच्या 'त्या' व्हिडीओमुळे एकच खळबळ title=

आयपीएल 2024 च्या आधी, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले. संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. यानंतर काय झाले हे सर्व क्रिकेट चाहत्यांना माहीतच आहे. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या आणि रोहित शर्माच्या चाहत्यांकडून रोश पत्करावा लागला.  हार्दिकला पहिल्याच सामन्यापासून रोहित आणि मुंबईच्या चाहत्यांच्या रोशाला सामोरे जावे लागले. सामन्यादरम्यान चाहत्यांनी हार्दिकच्या विरोधाला सामोरे जावे लागते. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आणि म्हटले की, भारतात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूला चाहत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे.

रोहितवर अन्याय झाल्याचे अनेकांना वाटत होते. मुंबईने 5 वेळा विजेतेपद पटकावले असतानाही रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय चाहत्यांना आवडलेला नाही. यामुळेच हार्दिकला मुंबईतील जवळपास प्रत्येक सामन्यात चाहत्यांच्या रोशाला सामोरे जावे लागले. आता मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असतानाच रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलताना दिसत आहे.

रोहितचा व्हिडिओ व्हायरल

IPL 2024 चा 60 वा सामना मुंबई आणि कोलकाता यांच्यात 11 मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. रोहित आणि अभिषेकमधील संभाषणाच्या या व्हिडिओमध्ये, ऑडिओ फारसा स्पष्ट नाही पण काही गोष्टी आहेत. ज्या ऐकून मुंबईचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. खरंतर व्हिडिओमध्ये रोहित म्हणतोय – “एक एक गोष्ट बदलत आहे… हे त्याच्यावर अवलंबून आहे… जे काही आहे ते माझं घर आहे भाऊ आहे, ते जे मंदिर आहे ते मी बनवलं आहे.” या संभाषणावरून रोहित मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत झालेल्या बदलांबद्दल बोलत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

व्हिडीओच्या शेवटी रोहित जे बोलतोय त्यामुळे अनेक चाहत्यांना हळवे झाले आहेत. मात्र, हे काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोहित शेवटी म्हणतो - भाऊ, जे माझे आहे ते शेवटचे आहे. यावर चाहत्यांना वाटते की, कदाचित हा रोहितचा मुंबईसाठी शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो.

चाहत्यांचे म्हणणे आहे की, रोहित आणि अभिषेक नायर यांच्यातील संभाषणाचा हा व्हिडिओ केकेआरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता पण नंतर तो काढून टाकण्यात आला. IPL 2024 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ आहे. यावेळी हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खूपच निराशाजनक आहे.