IND vs AUS: Rohit Sharma च्या 'त्या' एका निर्णयामुळे टीम इंडिया पराभवाच्या छायेत!

टीम इंडियाचा (Team India) पहिल्याच दिवशी फ्लॉप शो पहायला मिळाला. यावेळी टीम इंडियाच्या कर्णधाराच्या एका निर्णयामुळे ही परिस्थितीत उद्भवली असल्याची चर्चा आता सगळीकडे होतेय. 

Updated: Mar 1, 2023, 08:06 PM IST
IND vs AUS: Rohit Sharma च्या 'त्या' एका निर्णयामुळे टीम इंडिया पराभवाच्या छायेत! title=

Rohit Sharma : बॉर्डर गावस्कर सिरीजचा (Border–Gavaskar Trophy) तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये बुधवारपासून खेळवण्यात येतोय. पहिल्या 2 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमने (Australia Team) तिसऱ्या टेस्ट सामन्यात चांगली सुरुवात केली. इंदूर टेस्ट सामन्यावर कांगारूंनी चांगली मजबूत पकड बनवली असून टीम इंडियाचा (Team India) पहिल्याच दिवशी फ्लॉप शो पहायला मिळाला. यावेळी टीम इंडियाच्या कर्णधाराच्या एका निर्णयामुळे ही परिस्थितीत उद्भवली असल्याची चर्चा आता सगळीकडे होतेय. 

रोहित शर्माचा (Rohit Sharma) 'हा' निर्णय आला अंगलगट

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा हाच निर्णय अंगाशी आला आणि अवघ्या 109 रन्सवर टीम इंडिया ऑल आऊट झाली. तर दुसरीकडे पहिल्या दिवसाच्या अखेरीस 4 विकेट गमावून 156 रन्सवर ऑस्ट्रेलियाटी टीम आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने 47 रन्सची आघाडीही घेतली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया पराभवाच्या छायेत असून टॉसनंतरचा निर्णय याला जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय.

टीम इंडियाचे फलंदाज ठरले फ्लॉप

रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताचे फलंदाज फ्लॉप गेले. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला 30 पेक्षा अधिक रन्स करता आले नाहीत. यावेळी विराटने सर्वाधिक म्हणजेच 22 रन्स केले. त्यानंतर शुभमन गिलने 21 रन्सची खेळी केली. रोहित शर्मा 12, भरत 17 तर अक्षर पटेल 12 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतले. कांगारूंच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.

आर अश्विनने पटकावला बहुमान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने गोलंदाजांची कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. यात भारतीय गोलंदाजाने अव्वल स्थान पटकावंत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला (James Anderson) मागे टाकलं आहे. टीम इंडियाचा दिग्गज स्पीन गोलंदाज आर अश्विन जगातील नंबर वन गोलंदाज नबला आहे. 36 वर्षांच्या आर अश्विनच्या (R Ashwin) खात्यात 864 पॉईंट जमा झाले आहेत. तर जेम्स अँडरसनच्या खात्यात 859 पॉईंट्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 858 पॉईंट्सह तिसऱ्या क्रमांकावर आहे.