अखेर रोहित शर्माला सुर गवसला

पाचव्या एकदिवसीय सामन्यात अखेर रोहित शर्माला सुर गवसला. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 14, 2018, 09:22 AM IST
अखेर रोहित शर्माला सुर गवसला title=

पोर्ट एलिझाबेथ : पाचव्या एकदिवसीय सामन्यात अखेर रोहित शर्माला सुर गवसला. 

115 धावांची झुंजार खेळी 

रोहित शर्माने 115 धावांची झुंजार खेळी केली. फॉर्मसाठी चाचपडत असलेल्या रोहितची बॅट पाचव्या एकदिवसीय सामन्यात चांगलीच तळपली. आणि त्यानं दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची चांगलीच दाणदाण उडवून टाकली. 

17 वं शतक

रोहित शर्मानं आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 17 वं शतक झळकावलं. रोहितनं 126 चेंडूत 115 धावा केल्या. यामध्ये 11 चौकार तर 4 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.

सिरीज जिंकली

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर गेलेल्या भारतीय संघाने नवा इतिहास रचत एकदिवसीय मालिका 4-1ने आपल्या खिशात टाकली. दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा हा पहिला मालिका विजय आहे.