ऋतुराज गायकवाड झाला टीम इंडियाचा नवा कॅप्टन; BCCI ने अचानक केली घोषणा, रिंकू सिंहला संधी!

Asian Games 2023, Team India: आशिया क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) कर्णधारपद सोपवण्यात आली आहे. रिंकू सिंह (Rinku Singh) याला देखील संधी देण्यात आलीये.

Updated: Jul 15, 2023, 12:37 AM IST
ऋतुराज गायकवाड झाला टीम इंडियाचा नवा कॅप्टन; BCCI ने अचानक केली घोषणा, रिंकू सिंहला संधी! title=
Ruturaj Gaikwad, Team India, Asian Games 2023

Asian Games Team India Squad:  येत्या 28 सप्टेंबरपासून खेळवल्या जाणाऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  8 ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. आशिया क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यंदा भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघ सहभागी होणार आहेत. मराठमोळा ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवण्यात आली आहे. तर संघात युवा खेळाडू रिंकू सिंह याला देखील संधी मिळाली आहे.

बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची देखील घोषणा केली आहे. या संघाच्या कर्णधारपदी हरमनप्रीत कौरची नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. महिला संघात शिखा पांडे आणि रेणुका सिंग या अनुभवी गोलंदाजांना या संघात स्थान मिळालं नाही.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरूष संघ

ऋतुराज गायकवाड (C), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (WK), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (WK)

राखीव खेळाडू - यश ठाकूर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन .

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ

हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (WK), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनिल छेत्री.

राखीव खेळाडू: हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक आणि पूजा वस्त्राकर.

तिसऱ्यांदा होणार स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्यांदा क्रिकेट स्पर्धा होणार आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्यांदा क्रिकेटचे आयोजन करण्यात येणार आहे. 2010 आणि 2014 च्या खेळांमध्येही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये BCCI ने पुरुष किंवा महिला संघ पाठवला नाही. 2010 च्या गेम्समध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानने अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकलं. आणि 2014 मध्ये श्रीलंकेने पुरुष गटात आणि पाकिस्तानने महिला गटात सुवर्णपदक जिंकलं होतं.