Shahid Afridi: "भारतातून आम्हाला धमक्या येत होत्या, जेव्हा..."; शाहिद अफ्रिदीची रडारड सुरू!

Asia Cup 2023, BCCI vs PCB: भारत आशिया कप स्पर्धा खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. 

Updated: Mar 24, 2023, 04:07 PM IST
Shahid Afridi: "भारतातून आम्हाला धमक्या येत होत्या, जेव्हा..."; शाहिद अफ्रिदीची रडारड सुरू!  title=
Shahid Afridi

Shahid Afridi Blames On India: गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट बोर्ड बीसीसीआय (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पीसीबी (PCB) यांच्यात सुरू असलेला वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कप (Asia Cup 2023) स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे आता भारत आशिया कप स्पर्धा खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. (Shahid Afridi Blames On India To Give Security Threat Calls Over Asia Cup Bcci Vs Pcb Fight latest marathi news)

काय म्हणाला Shahid Afridi ?

पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा प्रश्न असेल तर तो प्रश्न केवळ भारतालाच आहे का? असा सवाल शाहिद अफ्रिदीने (Shahid Afridi Blames On India) विचारला आहे. आम्हाला सुद्धा भारताकडून धमक्या येत होत्या, पण ज्यावेळी बोर्ड आणि सरकार एकाच निर्णयावर असतात तेव्हा दौरा थांबवला जात नाही, असं वक्तव्य करत शाहिद अफ्रिदीने एकच खळबळ उडवली आहे. भारत वगळता इतर संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्याचा आनंद घेतला आहे, असंही शाहिद अफ्रिदी म्हणतो.

भारतामध्ये खेळण्यास आम्ही कधीच नकार दिला नाही. जर आता भारताने भूमिका घेतली तर त्यांना द्वेष पसरवायचा आहे, असा अर्थ निघतो, असं म्हणत अफ्रिदीने भारतावर टीका केली आहे. मी अपेक्षा केली नव्हती, भारतातून मला खूप प्रेम मिळालं आहे. आम्हालाही भारतात खेळायचंय म्हणत शाहिद अफ्रिदीने रडारडी सुरू केली आहे. अफ्रिदीच्या वक्तव्यावर अद्याप बीसीसीआयने (BCCI) उत्तर दिलं नाही.

कसं असेल वेळापत्रक? (Asia Cup 2023 Schedule)

पाकिस्तानमध्ये (Asia Cup 2023 Schedule) खेळवला जाणारा आशिया कप 18 एप्रिलपासून खेळवला जाईल. 18 एप्रिल ते 1 मे या कालावधीत पात्रता सामने रंगणार आहेत. तर राखीव दिवस देखील ठेवण्यात आलाय. पात्रता फेरीत 10 संघ खेळणार आहेत. पात्रता फेरीत 10 संघ 2 गटात विभागले गेले आहेत. त्यातील एक संघ आशिया कपमध्ये खेळणार आहे.

Asia cup 2023 : पाकिस्तानातच होणार आशिया चषक; भारतीय संघ खेळणार की नाही?

BCCI चा दबदबा संपला ?

ICC वर BCCI चा दबदबा असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे पाकिस्तान सतात्याने मुद्दा उचलून धरत असल्याचं दिसून येत होतं. अशातच आता आशिया कप पाकिस्तानात होत असल्याने BCCI चा दबदबा संपला का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) धक्कादायक दावा

दरम्यान, मी करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना इम्रान नजीरने (Imran Nazir) माझ्यावर विष प्रयोग करण्यात आल्याचा दावा शाहिद अफ्रिदीने केला होता. त्यानंतर मोठा वाद उद्भवल्याचं दिसून आलं होतं.