महाराष्ट्र कन्या तेजस्विनी सावंतला वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदक

Updated: May 24, 2018, 01:53 PM IST

म्युनिच : महाराष्ट्राची नेमबाज तेजस्विनी सावंतनं  नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदाकाला गवसणी घातली आहे. मुनिच इथं सुरु असलेल्या स्पर्धेत तेजस्विनीनं ६२१.४ गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. तेजस्विनीनं गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलिया इथं झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली होती. दरम्यान विश्वचषकात तेजस्विनीच्याच प्रकारात भारताच्या अंजूम मौदगिलनं रौप्य पदक पटकावलय. तर चैन सिंगनं पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदक जिंकलं. २००६मध्ये मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीने १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर रायफल जोडी प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.