रोहित शर्मा-राहुल द्रविडचं या खेळाडूकडे वारंवार दुर्लक्ष, संधी कधी देणार?

टीम इडियांच्या (Team India) या खेळाडूला कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) क्षमता असूनही संधी देत नाहीये. त्यामुळे या खेळाडूची कारकिर्दीला ब्रेक लागतो की काय, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Updated: Mar 9, 2022, 09:57 PM IST
रोहित शर्मा-राहुल द्रविडचं या खेळाडूकडे वारंवार दुर्लक्ष, संधी कधी देणार? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : टीम इंडिया रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात शानदार कामगिरी करत आहे. टीम इंडियाने हिटमॅनच्या कॅप्टन्सीत सुपरहिट कामगिरी केली आहे. न्यूझीलंड, वेस्टइंडिज आणि आता श्रीलंकेला टी 20 मालिकेत क्लीन स्पीर दिला. या तिन्ही मालिकांमध्ये रोहितने युवा खेळाडूंना वारंवार संधी दिली. मात्र असाही एक खेळाडू आहे, ज्याला कॅप्टन रोहित शर्मा क्षमता असूनही संधी देत नाहीयेत. त्यामुळे या खेळाडूची कारकिर्दीला ब्रेक लागतो की काय, अशी भिती व्यक्त केली जात आहे.  (team india captain rohit sharma has not given chance to mohmmed siraj in 1st test playing eleven against sri lanka)

या खेळाडूला संधी नाही

श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडियाच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी कमबॅक केलं. यामध्ये रवींद्र जाडेजाचं समावेश होता. जाडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 222 धावा आणि डावाने श्रीलंकेवर पहिल्या कसोटीत विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

रोहितने या पहिल्या सामन्यात विराटचा लाडका असलेला मोहम्मद सिराजला (Mohmmed Siraj)  संधी दिली नाही.  सिराज सध्या चांगल्या फॉर्मात आहे. सिराज सामन्याच्या सुरुवातील विकेट्स मिळवून देण्यात माहिर आहे.    

सिराज 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील महत्त्वाचा भाग होता. तसेच आता 8 महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. ऑस्ट्रेलियामधील खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असतात. त्यामुळे रोहितने सिराजला संधी द्यायला हवी होती.

मात्र यानंतरही रोहित दुसऱ्या कसोटीत सिराजला प्लेइंग इलेव्हमध्ये संधी देणार का,  याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. दुसरा कसोटी सामना हा बंगळुरुत 12-16 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे.