टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा

भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.

Updated: Aug 15, 2017, 01:50 PM IST
टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा title=

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.

या दरम्यान टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रीसह भारतीय टीमचे सर्व खेळाडू उपस्थित होते. बीसीसीआयने ध्वजारोहणाचा व्हीडिओ शेअर केला आहे.

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. टेस्ट सिरीजमध्ये जबरदस्त कामगिरी करत टीम इंडिया ही टेस्ट सिरीज ३-० ने जिंकली. विराटच्या टीमने ८५ वर्षात पहिल्यांदा दुसऱ्या देशात जाऊन त्याच्यांच धरतीवर क्लीन स्वीप केलं. पल्लेकले टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशीच भारतीय संघाने श्रीलंकेला एक इनिंग आणि १७२ रनने पराभवाची धूळ चारली.

पाहा व्हिडिओ