Ind vs Ned, T20 World Cup 2022 : नेदरलँड सामन्याआधी टीम इंडियाचा सराव करण्यास नकार, भारतीय क्रिकेटपटू तीव्र नाराज

India vs Netherlands T20 World Cup 2022: भारताचा उद्या म्हणजे 27 ऑक्टोबर गुरुवारी नेदरलँडशी सामना होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियातील खेळाडूंमध्ये नाराजी आहे. नेमकं काय कारण ठरलं जाणून घेऊयात.

Updated: Oct 27, 2022, 02:02 PM IST

Ind vs ned t20 world cup - Team_India_Got_Bad_Food

Team India Got Bad Food In sydney : नेदरलँड (Netherlands) सामन्याआधी टीम इंडियाबाबत (Team India) मोठी बातमी आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केल्यानंतर टीम इंडिया नेदरलँडशी दोन हात करण्यासाठी सिडनीमध्ये दाखल झाली आहे. पण नेदरलँड सामन्याआधी टीम इंडियाने सराव करण्यास नकार दिला आहे. भारताचा उद्या म्हणजे 27 ऑक्टोबर गुरुवारी नेदरलँडशी सामना होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियातील खेळाडूंमध्ये नाराजी आहे. नेमकं काय कारण ठरलं जाणून घेऊयात. (Team India Got Bad Food In sydney nmp)

भारतीय क्रिकेटपटू तीव्र नाराज (Indian Cricke Team Unhappy)

बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सराव सत्रानंतर लंचमध्ये जे जेवण देण्यात आले त्यानंतर भारतीय खेळाडू नाराज आहेत. उद्या सिडनीमध्ये भारताचा नेदरलँडशी सामना होणार आहे. खेळाडूंना जे काही जेवण दिले जात होते ते निकृष्ट दर्जाचे होते आणि तेही थंड (team india food controversey in sydney) होते. एवढंच नाही तर त्यांना जेवण्यात सँडविच (sandwich) देण्यात आलं. याबाबत बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केली आहे. (BCCI has complained to ICC)

सराव करण्यास नकार (Refusal to practice)

दरम्यान बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाने सराव करण्यासही नकार दिला. कारण त्यांना ब्लॅकटाउनमध्ये (Blacktown) सराव करण्यासाठी मैदान देण्यात आले होते. हे मैदान टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलपासून 42 किमी अंतरावर असल्याने टीम इंडियाने तिथे जाणे टाळले. 

टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया देण्यात आलेली वागणूक पाहून क्रिकेट विश्वास नाराजी व्यक्त करण्यात येतं आहे. दरम्यान उद्या होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज असून विजयाची घोडदौड कायम ठेवणार आहे, असा विश्वास टीम इंडियाकडून देण्यात आला आहे.