दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा हुकमाच्या एक्क्याला दुखापत झाली आहे.  

Updated: Dec 13, 2021, 03:04 PM IST
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, स्टार खेळाडूला दुखापत title=

मुंबई : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa 2021 22) जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) आफ्रिके विरुद्ध कसोटी आणि एकदविसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ही 26 डिसेंबरपासून कसोटीने मालिकेने होणार आहे. टीम इंडिया आफ्रिकेसाठी 16 डिसेंबरला उड्डाण भरणार आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा हुकमाच्या एक्क्याला दुखापत झाली आहे. (team india hitaman rohit sharma injured during practise session with throwdown specialis d raghavendra before south africa tour)

कोण आहे तो?

टी 20 आणि वनडे टीमचा कॅप्टन आणि कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाली आहे. रोहित शर्मा मुंबईत सराव करत होता. या सरावादरम्यान त्याला ही दुखापत झाली. 

मुंबईत रोहित आणि थ्रो डाऊन स्पेशालिस्ट राघवेंद्र (Throwdown Specialis D Raghavendra) सराव करत होते. या सरावादरम्यान रोहितला दुखापत झाली. राघवेंद्रने थ्रो केलेला चेंडू रोहितच्या हातावरुन आदळला. त्यामुळे रोहितला दुखापत झाली.    

रोहितला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची आहे की नाही, याबाबत अजून काही माहिती मिळालेली नाही. ही दुखापत फार गंभीर स्वरुपाची नसावी, अशीच प्रार्थना ही रोहितच्या चाहत्यांकडून करण्यात येत आहे.   

रोहितकडे 2 आठवड्यांचा वेळ 

रोहितचत्या दुखापतीबाबत अजून काही स्पष्ट नाही. मात्र ही दुखापत गंभीर असेल, तरीही रोहितकडे दुखापतीतून सावरण्यासाठी 2 आठवड्यांचा पुरेसा वेळ आहे. मात्र यानंतरही तो सावरला नाही, तर त्याला पहिल्या कसोटीला मुकावं लागू शकतं. 

रोहितला दुखापत मॅनेजमेंट चिंतेत

रोहितच्या दुखापतीमुळे टीम मॅनेजमेंटची चिंताही काहीशा प्रमाणात वाढली आहे. रोहितचं दुखापतीतून सावरणं हे टीमसाठी महत्त्वाचं आहे. कारण रोहित कसोटी क्रिकेटमध्ये 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा जो रुटनंतर दुसराच फलंदाज आहे. 

रोहितने हाच फॉर्म कायम ठेवल्यास आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला याचा फायदा होईल. रोहितने इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत 52 पेक्षा अधिक सरासरीने 368 धावा केल्या आहेत.  

असा आहे आफ्रिका दौरा

कसोटी मालिकेचं वेळापत्रक 

पहिला सामना, 26-30 डिसेंबर,  सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन.  

दुसरा सामना, 3-7 जानेवारी 2022, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग.  
  
तिसरा सामना,  11-15 जानेवारी 2022,  केपटाऊन.