ऑस्ट्रेलियानंतर आता 'विराट'सेनेचा सामना न्यूझीलंडशी

ऑस्ट्रेलियानंतर आता 'विराट'सेनेचा सामना न्यूझीलंडशी 

Updated: Oct 13, 2017, 09:19 PM IST
ऑस्ट्रेलियानंतर आता 'विराट'सेनेचा सामना न्यूझीलंडशी  title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी २० पावसामुळे रद्द करण्यात आली. ही मॅच रद्द झाल्यामुळे टी २० सीरिज बरोबरीमध्ये सुटली आहे. तीन टी २० च्या या सीरिजमध्ये पहिली मॅच भारतानं तर दुसरी मॅच ऑस्ट्रेलियानं जिंकली. त्याआधी झालेल्या वनडे सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सीरिजनंतर भारत आता न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. न्यूझीलंडविरुद्ध भारताची ३ वनडे आणि ३ टी २० ची सीरिज होणार आहे. २२ ऑक्टोबरपासून या सीरिजला सुरुवात होणार असून ७ नोव्हेंबरला ही सीरिज संपेल.

न्यूझीलंड दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

१७ ऑक्टोबर - पहिला सराव सामना - सीसीआय, मुंबई

१९ ऑक्टोबर - दुसरा सराव सामना - सीसीआय, मुंबई

२२ ऑक्टोबर - पहिली वनडे, मुंबई, दुपारी १.३० वाजता

२५ ऑक्टोबर - दुसरी वनडे, पुणे, दुपारी १.३० वाजता

२९ ऑक्टोबर - तिसरी वनडे, (यूपीसीए ), दुपारी १.३० वाजता

टी  २० सीरिज

१ नोव्हेंबर - पहिली टी २० - नवी दिल्ली, सायंकाळी ७ वाजता

४ नोव्हेंबर - दुसरी टी २०, राजकोट, , सायंकाळी ७ वाजता

७ नोव्हेंबर - तिसरी टी २०, तिरुवनंतपुरम, सायंकाळी ७ वाजता