Hardik Pandya : टीमकडून चुका या होणार...; हार्दिक पंड्याने टाळली पराभवाची जबाबदारी?

Hardik Pandya : 5 सामन्यांच्या या टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) कडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने ( Hardik Pandya ) फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 4, 2023, 09:16 AM IST
Hardik Pandya : टीमकडून चुका या होणार...; हार्दिक पंड्याने टाळली पराभवाची जबाबदारी? title=

Hardik Pandya : वेस्ट इंडिज विरूद्ध ( IND vs WI ) भारत यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला. 5 सामन्यांच्या या टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) कडे सोपवण्यात आली आहे. यावेळी पहिल्या सामन्यात अवघ्या 4 रन्सने टीमचा पराभव झाला. दरम्यान सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने ( Hardik Pandya ) फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे. 

पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

वेस्ट इंडिजकडून दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) म्हणाला की, काही चांगल्या शॉर्ट्समुळे सामन्याचं चित्र पालटलं असतं. दिलेल्या लक्ष्याचा आम्ही चांगला पाठलाग करत होतो. मात्र आम्ही काही चुका केल्या ज्यामुळे आम्हाला सामना गमवावा लागला. एका युवा टीमकडून चुका या होणार आणि त्यातूनच आम्ही शिकणार. 

पंड्या पुढे म्हणाला की, टी-20 क्रिकेटमध्ये विकेट गमावल्यास लक्ष्याचा पाठलाग करणं कठीण होतं. मुख्य म्हणजे या सामन्यात आम्हाला दोन्ही रिस्ट स्पिनर्सना संधी द्यायची होती. मुकेश कुमारने ( Mukesh Kumar ) दोन आठवड्यांमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलंय. यावेळी त्याने बॅक टू बॅक गोलंदाजी केली.

दरम्यान या सामन्यामध्ये आयपीएलमध्ये ( IPL ) मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) खेळणारा फलंदाज तिलक वर्माने ( Tilak Verma ) टीम इंडियासाठी डेब्य केलं. यावेळी तिलकविषयी बोलताना कर्णधार म्हणाला, तिलक वर्माला ( Tilak Verma ) खेळताना पाहून मला प्रचंड आनंद झाला. तो आत्मविश्वासाने आणि न घाबरता खेळतो. आगामी काळात तिलक वर्मा आणि मुकेश कुमार हे टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू बनू शकतात.

भारताचा 4 रन्सने पराभव

पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजच्या टीमने टॉस जिंकला. यावेळी प्रथम फलंदाजी करत 6 विकेट्स गमावून 149 रन्स केले. यावेळी टीम इंडियाला अवघ्या 150 रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांना या सामन्यात साजेशी कामगिरी करता आली नाही. अखेर टीम इंडियाचा 4 रन्सने पराभव झाला.