सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये? शुभमन गिलने अखेर सोडलं मौन...

शुभमन गिलने इंस्टाग्रामवर अखेर मौन सोडले आहे. यूजर्सने विचारलेल्या प्रश्नावर शुभमन गिलने सारा आणि त्याचा नात्याचा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 28, 2022, 06:30 PM IST
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये? शुभमन गिलने अखेर सोडलं मौन... title=
trending news sachin tendulkar daughter sara tendulkar and cricketer shubman gil relationship revealed got married or not

Sara Tendulkar: बॉलिवूड कलाकार असो किंवा क्रिकेटपटू या दोघांच्या लाइफमध्ये डोकवायला चाहत्यांना खूप आवडतं. सध्या सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक आणि शुभमन गिलने लग्न केलं अशी चर्चा रंगली होती. 

सारा तेंडुलकरचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. सारा तेंडुलकर असो किंवा शुभमन गिल असो या दोघांबद्दल गुगलवर काही पण सर्च केल्यावर हे दोघे डेट करत आहेत. अगदी त्या दोघांनी लग्न केलं आहे असं समोर येतं. मीडियामध्येही या संबंधी अनेक हेडलाइन तुम्ही पाहिल्या असतील. (trending news sachin tendulkar daughter sara tendulkar and cricketer shubman gil relationship revealed got married or not)

पण या सगळ्या बातम्यानंतर शुभमन गिलने इंस्टाग्रामवर अखेर मौन सोडले आहे. यूजर्सने विचारलेल्या प्रश्नावर शुभमन गिलने सारा आणि त्याचा नात्याचा खुलासा केला आहे. शुभमन गिलने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल छान प्रतिक्रिया दिली.

या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे.  इंस्टाग्रामवर एका यूजर्सने विचारलं की, तुम्ही अविवाहित आहात की रिलेशनशिपमध्ये आहात? त्यावर गिलने उत्तर दिलं आहे की, ''मी सध्या सिंगल आहे. तसंच भविष्यातही या विषयावर विचार करण्याची माझी योजना नाही.'' 

सचिनची मुलगी सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी झाली. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंटही करतात. अशा परिस्थितीत दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याची अफवा लोकांनी सुरू केली. म्हणजेच सारा आणि शुभमन एकमेकांना डेट करत आहेत. बरं, ही संपूर्ण गोष्ट निव्वळ अफवा ठरली.