मॅच फिक्सिंगप्रकरणी या दिग्गज खेळाडूवर आठ वर्षांची बंदी

एकेकाळी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर

Updated: Jul 12, 2017, 07:55 PM IST
मॅच फिक्सिंगप्रकरणी या दिग्गज खेळाडूवर आठ वर्षांची बंदी  title=

जोहान्सबर्ग : एकेकाळी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर लोनवाबो त्सोत्सोबेवर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. २०१५ साली दक्षिण आफ्रिकेच्या प्रथमश्रेणी टी-20 स्पर्धा रॅमस्लॅममध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी त्सोत्सोबेवर ही कारवाई करण्यात आली आहे. 

मॅच फिक्सिंगप्रकरणी कारवाई झालेला त्सोत्सोबे हा दक्षिण आफ्रिकेचा सातवा क्रिकेटपटू आहे. याआधी गुलाम बोदी, अलव्हिरो पिटरसन, थमी त्सोलकाईल, जीन सायम्स, पुमेलेला मतशिवके आणि एथी एमभालती यांच्यावर दोन वर्ष ते वीस वर्षांपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्सोत्सोबेनं केलेल्या गुन्ह्याची कबुली केल्यानंतर त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली.  

मॅच फिक्सिंगप्रकरणी कारवाई करण्यात आलेला त्सोत्सोबे हा शेवटचा खेळाडू आहे. नोव्हेंबर २०१५मध्ये या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली होती आणि २० महिन्यानंतर आता एकूण सात खेळाडूंवर कारवाई करण्यात आली.