Dhoni | 'कॅप्टन कूल' धोनीला ट्विटरकडून मोठा झटका, नक्की काय घडलं?

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) ट्विटरने (Twitter) मोठा झटका दिला आहे.

Updated: Aug 6, 2021, 05:03 PM IST
Dhoni |  'कॅप्टन कूल' धोनीला ट्विटरकडून मोठा झटका, नक्की काय घडलं? title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) ट्विटरने (Twitter) मोठा झटका दिला आहे. ट्विटरने धोनीच्या ट्विटर अकाउंटवरील ब्लू टीक (Twitter Blue Tick) हटवली आहे. धोनी ट्विटर फार सक्रीय नसतो. त्यामुळे त्याच्या अकाऊंटवरील ब्लू टीक काढण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. पण यामागचं नेमकं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. धोनीने या वर्षी जानेवारी महिन्यात 8 जानेवारीला अखेरचं ट्विट केलं होतं. धोनीचे ट्विटरवर एकूण 8.2 मिनियन फॉलोअर्स आहेत. (twitter has removed team india former captain mahendra singh dhoni account blue tick removed) 

काही वृत्तांनुसार, ट्विटरच्या वेरिफिकेशन पॉलिसीच्या नियमांनुसार संबंधित ट्विटर युझरने आपलं खातं बदललं असल्यास किंवा 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ सक्रीय नसल्यास ब्लू टीक काढून घेतो. धोनीचं ट्विटर खातं बॅन तर केलेलं नाही. मात्र त्याच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक काढण्यात आलेली आहे.

ब्लू टीक म्हणजे काय?

सोशल मीडिया पॅल्टफॉर्मवर प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांनी अनेक फॅनपेज तसेच अकाऊंट तयार केले जातात. पण नेमकं खरं अकाउंट कोणतं आणि फॅन पेज तसेच फेक अकाउंट कोणतं, हे समजत नाही. त्यामुळे प्रसिद्ध लोकांच्या ऑफिशिअल अकाउंटला ब्लू टीक दिली जाते.