महिला क्रिकेटपटूचं मैदानावर लग्नाचं अनोखं फोटोशूट

कोण आहे ही महिला क्रिकेटर...

Updated: Oct 22, 2020, 09:00 AM IST
महिला क्रिकेटपटूचं मैदानावर लग्नाचं अनोखं फोटोशूट title=

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये लग्नाच्या आधी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फूटशूट्स आयोजित करण्याचा ट्रेंड वाढला आहे. हा विशेष क्षण सर्वांना संस्मरणीय बनवायचा आहे. आता या ट्रेंडमध्ये क्रिकेटपटूंनी उडी मारण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशची महिला क्रिकेटपटू संजीदा इस्लामने तिच्या लग्नाच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

संजीदाच्या लग्नाचं फोटोशूट वेगळ्या प्रकारे केले आहे. क्रिकेटच्या खेळपट्टीवरच तिने हे शूट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये संजीदाने खेळपट्टीवर नारंगी रंगाची साडी परिधान केली असून दागिने घालून हातात बॅट पकडून उभी आहे.

क्रिकेटपटू संजीदाने नुकताच रंगपूरचा प्रथम श्रेणी क्रिकेटर मीम मोसद्दिक याच्याशी लग्न केले आहे. संजीदाच्या प्री वेडिंग फोटोशूटचे फोटो आयसीसीने शेअर केले आहेत. संजीदाने ऑगस्ट 2012 मध्ये आयर्लंडविरुद्ध टी20 सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2018 मध्ये, ती त्या संघाचा भाग होती ज्यांनी प्रथमच महिला आशिया चषक टी-20 चे विजेतेपद जिंकले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

নতুন জীবনের সূচনালগ্নে

A post shared by Sanjida Islam (@mistycricketer_10) on