रणजी फायनल : विदर्भ इतिहास घडवण्याच्या तयारीत

इंदुरमध्ये  सुरु असलेल्या रणजी  फायनलमध्ये विदर्भाने दिल्लीविरुद्ध तिस-या दिवसअखेर २३३ रन्सची भक्कम आघाडी घेतलीये.

Updated: Dec 31, 2017, 08:13 PM IST
रणजी फायनल : विदर्भ इतिहास घडवण्याच्या तयारीत  title=

इंदूर : इंदुरमध्ये  सुरु असलेल्या रणजी  फायनलमध्ये विदर्भाने दिल्लीविरुद्ध तिस-या दिवसअखेर २३३ रन्सची भक्कम आघाडी घेतलीये. अक्षय वाडकरच्या नाबाद १३३ रन्सच्या जोरावर विदर्भाने मॅचवर आपली पकड निर्माण केली असून दिवसअखेर विदर्भाने ७ विकेट गमावून ५२८ रन्सचा स्कोअर केला आहे.

अक्षय वाडकरबरोबरच सिद्धेश नेरल ५६ रन्सवर अजूनही क्रीझवर आहे. तिस-या दिवशी ४ बाद २०६ वरून पुढे खेळताना अक्षय वखरे आणि वसीम जाफरची विकेट विदर्भाने २५० रन्सपूर्वीच गमावली होती. दिल्लीने कमबॅक केला होता. मात्र त्यानंतर दिल्लीच्या बॉलर्सचे मनसुबे अक्षय वाडकर आणि आदित्य सरवटेने उधळून लावले.

अक्षय आणि आदित्य सातव्या विकेटसाठी १६९ रन्सची पार्टनरशीप करत विदर्भाला चांगली आघाडी मिळवून दिली. आदित्य सरवटे ७९ रन्सवर आऊट झाला. त्यानंतर अक्षयने सिद्धेश नेरलसोबत विदर्भाला ५०० रन्सचा टप्पा गाठून दिला.

अक्षयने सेंच्युरी लगावली तर सिद्धशने हाफ सेंच्युरी लगावत विदर्भाला दिवसअखेर २३३ रन्सची भक्कम आघाडी मिळवून दिली. आदित्य आणि सिद्धेशने आठव्या विकेटसाठी नाबाद ११३ रन्सची पार्टनरशीप केली.  लोअर मीडिल ऑर्डरने केलेल्या जिगरबाज बॅटिंगमुळे विदर्भाला आता पहिले रणजी विजेतेपद जिंकण्याची चांगली संधी आहे.