Virat Kohli : टीम इंडियाला अडचणीत पाहताच कोहलीनं अचानक पॅड बांधलं आणि बॅट घेऊन...

Virat Kohli : शुभमन गिल सोडून टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान फलंदाजी सुरु असताना डग आऊटमधून विराट कोहलीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

सुरभि जगदीश | Updated: Sep 16, 2023, 11:56 AM IST
Virat Kohli : टीम इंडियाला अडचणीत पाहताच कोहलीनं अचानक पॅड बांधलं आणि बॅट घेऊन... title=

Virat Kohli : एशिया कपमध्ये टीम इंडियाने पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशाने टीम इंडियाचा 6 रन्सने पराभव केला आहे. बांगलादेशाविरूद्धच्या सामन्यामध्ये भारताने टीम इंडियामध्ये 5 बदल केले होते. यावेळी विराट कोहलीला टीमच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं. या सामन्यामध्ये शुभमन गिल सोडून टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान फलंदाजी सुरु असताना डग आऊटमधून विराट कोहलीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

विराट कोहली हा टीम इंडियाच्या फलंदाजीचा कणा मानला जातो. बांगलादेश विरूद्ध टीमची फलंदाची पूर्णपणे ढेपाळली. अशामध्ये टीम अडचणीत असताना कोहली आपल्या टीमसाठी उभा राहणार नाही असं होऊ शकत नाही. यावेळी डग आऊटमधून असं दृश्य पाहायला मिळालं की, टीम इंडियाची फलंदाजी ढासळतेय आणि दुसरीकडे विराट कोहली पॅड घालून तयारी करत असल्याचं दिसून आलं. दरम्यान या एक व्हिडिओही समोर आला आहे.

फलंदाजीसाठी तयार होत होता विराट

सामना सुरु होत असताना कॅमेरामनची नजर विराट कोहलीकडे गेली. यावेळी तिथे विराट पूर्णपणे तयार दिसत होता. त्याने पॅड घातलं होत आणि हातात बॅट देखील होती. शेजारी हेल्मेट असून त्यात ग्लोजदेखील पहायला मिळाले. त्यामुळे चाहत्यांच्या मनात आता विराट फलंदाजीसाठी उतरतो की काय असा प्रश्न येऊन गेला.

टीम इंडियाची फलंदाजी पत्त्यांप्रमाणे ढेपाळली

बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज, यांना विश्रांती देण्यात आली. बांगलादेशाने प्रथम फलंदाजी करत विजयासाठी 266 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं. यावेळी टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. 

कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलने (Shubhaman Gill) भारतीय डावाची सुरुवात केली. पण सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर एकही प्रमुख फलंदाज मैदानावर फार काळ टिकला नाही. डेब्यू सामना खेळणारा तिलक वर्मा केवळ 5 धावा करुन बाद झाला. तर तर केएल राहुलने 19 धावा केल्या. एशिया कपमध्ये पहिल्यांदाच संघात संधी मिळालेल्या सूर्यकुमार यादवलाही मोठी धावसंख्या करता आली नाही. तो 26 धावा करुन बाद झाला. तर ईशान किशन 5 आणि रविंद्र जडेजा 7 धावांवर बाद झाला. केवळ शुभमन गिल एका बाजूने लढत होता. त्याने 121 रन्सची खेळी केली.