मुंबईच्या पराभवानंतर विराटने अनुष्काला असं दिलं बर्थडे गिफ्ट

असं दिलं विराटने अनुष्काला गिफ्ट

शैलेश मुसळे | Updated: May 2, 2018, 02:42 PM IST
मुंबईच्या पराभवानंतर विराटने अनुष्काला असं दिलं बर्थडे गिफ्ट title=

बंगळुरु : गोलंदाज टिम साउदी भेदक गोलंदाजीच्या जोरावर बंगळुरुने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 31व्या सामन्यात मुंबईचा 14 रनने पराभव केला. बंगळुरुने याआधी बॅटींग करत सात विकेटवर 167 रन केले होते. मुंबईने 20 ओव्हरमध्ये सात विकेट गमवत फक्त 153 रन केले. ज्यामुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरुचा 8 सामन्यांमध्ये हा तिसरा विजय होता. 6 गुणांसह बंगळुरु पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर मुंबईला 6 व्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

मॅच संपल्यानंतर कोहलीने त्यांच्या पत्नीबाबत देखील वक्तव्य केलं आहे. कोहलीने म्हटलं की, माझ्या पत्नीचा आज वाढदिवस आहे आणि मुंबईला पराभूत करत 2 अंक मिळवणं हा एक चांगला अनुभव आहे. अनुष्का बंगळुरुला सपोर्ट करण्यासाठी सध्या मैदानावर दिसत आहे.