अनुष्काच्या 'परी' वर विराट कोहलीचं खास ट्विट

अभिनेत्री अनुष्का शर्माचा 'परी' हा चित्रपट आज प्रदर्शित करण्यात आला आहे.

Updated: Mar 2, 2018, 05:18 PM IST
अनुष्काच्या 'परी' वर विराट कोहलीचं खास ट्विट   title=

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माचा 'परी' हा चित्रपट आज प्रदर्शित करण्यात आला आहे.

'परी' हा भयपट असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता होते. होळीच्या लॉंग विकेंडला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आल्याने हा चित्रपट बॉक्सऑफिवर किती कमाई  करणार याबाबत उत्सुकता आहे.  

विराट कोहलीने केले कौतुक  

'परी' या चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा ही प्रमुख नायिकेच्या भूमिकेत आहे. सोबतच या  चित्रपटाची निर्मितीदेखील अनुष्का शर्माने केलेली असल्याने तिच्यावर दुहेरी जबाबदारी होती.  

विराट कोहलीने काल हा चित्रपट पाहिल्यानंतर ट्विट  केले आहे. या ट्विटमध्ये अनुष्काचं कौतुक करण्यात आल्याने सध्या ती नक्कीच आनंदात आहे.   

 

लग्नानंतर पहिलाच चित्रपट  

अनुष्का आणि विराटच्या लग्नानंतर प्रदर्शित झालेला 'परी' हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाची रिलीज डेट पद्मावत, पॅडमॅनशी टक्कर टाळण्यासाठी पोस्टपोर्न करण्यात आली होती. 

लवकरच अनुष्का शाहरूख खानसोबत आगामी सिनेमामध्ये झळकणार आहे.