आयसीसीच्या तब्बल ५ अवॉर्ड्सवर विराटची बाजी

आयसीसी अॅवॉर्डवर विराटचाच बोलबाला

Updated: Jan 22, 2019, 12:26 PM IST
आयसीसीच्या तब्बल ५ अवॉर्ड्सवर विराटची बाजी title=

दुबई : इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC)ने २०१८ च्या सर्वश्रेष्ठ कामगिरीवर विविध अवॉर्डची घोषणा केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हॅट्रीक केली आहे. विराट हा आयसीसीच्या वनडे तसेच टेस्ट टीमचा देखील कर्णधार ठरला आहे. आयसीसीने आज वनडे टीम ऑफ द ईयर आणि आयसीसी टेस्ट टीम ऑफ द ईयरची घोषणा केली. ज्यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला या मान मिळाला आहे. महत्त्वाचं म्हणजे आयसीसीच्या वनडे टीममध्ये ४ भारतीय खेळाडूंना स्थान मिळालं आहे. तर टेस्ट टीममध्ये ३ भारतीय खेळाडूंना स्थान मिळालं आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली याने २०१८ मध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी करत भारतीय टीमला देखील अनेक सामने जिंकवून दिले. विराट कोहली हा २०१८ मधील सर्वश्रेष्ठ क्रिकेटर ठरला आहे. दुसऱ्यादा विराटला आयसीसीच्या वनडे क्रिकेटर ऑफ द ईयरचा अॅवॉर्ड मिळाला आहे. विराटने २०१८ या वर्षात वनडेमध्ये १२०१ रन केले आहेत. विराटने १३३.५५ च्या रनरेट हे रन केले. सोबतच वनडेमध्ये सर्वात जलद १० हजार रन करण्याचा विक्रम देखील त्याने मोडून काढला आहे. 

टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर

विराटने आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयरचा मान देखील मिळवला आहे. पहिल्यांदा त्याला हा मान मिळाला आहे. त्याने गेल्या वर्षभरात ५५.०८ च्या रनरेटने १३२२ रन केले आहेत. सोबतच त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतात शतक ठोकले आहेत.

विराटने २०१८ मध्ये ३७ सामने खेळले आहेत. यापैकी ४७ इनिंगमध्ये त्याने २७३५ रन केले आहेत. या दरम्याने ११ शतक आणि ० अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द ईयर २०१८ चा पुरस्कार देण्यात आला आहे.

विराटला मिळालेले अॅवॉर्ड्स