विराटचं पॅटर्निटी लिव्हवर स्पष्टीकरण; बाळाच्या जन्माविषयी झाला भावूक

विराट बाळाच्या जन्मासाठी पहिली कसोटी खेळल्यानंतर भारतात परतणार आहे.     

Updated: Nov 28, 2020, 09:09 AM IST
विराटचं पॅटर्निटी लिव्हवर स्पष्टीकरण; बाळाच्या जन्माविषयी झाला भावूक title=

सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय क्रिकेटसंघाची कामगिरी फारशी समाधानकारक राहिली नाही. पहिल्या वनडेमध्ये भारतीयसंघाला ६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. महत्त्वाचं म्हणजे विराट संघात असून देखील संघाला अपयशाचा सामना करावा लागला. दरम्यान बाळाच्या जन्माच्या वेळी आपण पत्नीसमवेत असावं या कारणासाठी विराटनं पॅटर्निटी लिव्हची मागणी केली होती. आता संघातून विराटने माघार घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियावर कशी मात करता येईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी पहिली कसोटी खेळल्यानंतर भारतात परतणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. शिवाय यासाठी त्याने निवड समितीकडे विनंती देखील केली होती. 

विराट म्हणाला होता की, 'निवड समितीच्या बैठकीमध्ये  संबंधित निर्णय घेण्यात आला होता आणि समितीला मी याबद्दल सांगितले देखील होते की पहिली कसोटी खेळल्यानंतर भारतात परतणार आहे. माझ्या कारणामध्ये तथ्य आहे. बाळाच्या जन्माच्या वेळी आपण पत्नीसमवेत असावं अशी माझी इच्छा आहे. 

तो पुढे म्हणाला की, हा एक विशेष आणि अतिशय सुंदर क्षण आहे जो मला अनुभवायचा असल्याचं स्पष्टीकरण विराटने दिलं . BCCI कडून त्याची ही मागणी मान्य करण्यात आली असून, त्याला ठराविक काळासाठी संघातून रजा दिली आहे.