विराट कोहली, सचिन आणि धोनी जाहिरातीतून करतात इतकी कमाई

क्रिकेटच्या जाहिरातीतून कमाई करण्याच्या बाबतीत विराट कोहलीने सगळ्यांनाच मागे टाकलेय. विराट कोहली केवळ मैदानावरच नाही तर ब्रँड एंडोर्समेंटमध्येही बाजी मारतोय. ईएसपी प्रॉपर्टीज आणि स्पोर्ट्स पॉवरच्या रिपोर्टनुसार विराट कोहली १९ ब्रँडची जाहिरात करतो. क्रिकेटच्या एंडोर्समेंटमध्ये १५.७७ टक्क्यांनी वाढ झालीये. २०१६मध्ये विराट कोहली २० ब्रँडची जाहिरात करत होता. यातून त्याने १२० कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान २०१७मध्ये तो १९ ब्रँडची जाहिरात करतोय. यातून त्याची कमाई वाढून १५० कोटी रुपये झालीये. ईएसपी प्रॉपर्टीचे बिझनेस हेड विनीत कार्निक यांनी टाईम्स नाऊ हिंदीशी बोलताना सांगितले, देशात नव्या पद्धतीची स्पोर्ट्स इकॉनॉमीचा विकास होतोय. नव्या युवा पिढीमुळे एंडोर्समेंटची संख्या वाढतेय. विनीत यांच्यामते कोहली मास्टर ऑफ एंडोर्समेंट आहे. 

Updated: Mar 22, 2018, 10:10 AM IST
विराट कोहली, सचिन आणि धोनी जाहिरातीतून करतात इतकी कमाई title=

मुंबई : क्रिकेटच्या जाहिरातीतून कमाई करण्याच्या बाबतीत विराट कोहलीने सगळ्यांनाच मागे टाकलेय. विराट कोहली केवळ मैदानावरच नाही तर ब्रँड एंडोर्समेंटमध्येही बाजी मारतोय. ईएसपी प्रॉपर्टीज आणि स्पोर्ट्स पॉवरच्या रिपोर्टनुसार विराट कोहली १९ ब्रँडची जाहिरात करतो. क्रिकेटच्या एंडोर्समेंटमध्ये १५.७७ टक्क्यांनी वाढ झालीये. २०१६मध्ये विराट कोहली २० ब्रँडची जाहिरात करत होता. यातून त्याने १२० कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान २०१७मध्ये तो १९ ब्रँडची जाहिरात करतोय. यातून त्याची कमाई वाढून १५० कोटी रुपये झालीये. ईएसपी प्रॉपर्टीचे बिझनेस हेड विनीत कार्निक यांनी टाईम्स नाऊ हिंदीशी बोलताना सांगितले, देशात नव्या पद्धतीची स्पोर्ट्स इकॉनॉमीचा विकास होतोय. नव्या युवा पिढीमुळे एंडोर्समेंटची संख्या वाढतेय. विनीत यांच्यामते कोहली मास्टर ऑफ एंडोर्समेंट आहे. 

धोनी १३ ब्रँडचा चेहरा आहे. यातून ५५ ते ६० कोटी रुपयांची कमाई होते. तर सचिन आताही ९ ब्रँडची जाहिरात करतो. यातून तो २५ ते ३० कोटी रुपयांची कमाई करतो. ब्रँडमधून कमाई करण्यामध्ये हार्दिक पांड्याही मागे नाही. टीम इंडियाचा हा ऑलराउंडर ७ ब्रँडची जाहिरात करतो. यातून तो ३.५ ते ४ कमाई करतो. याशिवाय पृथ्वी शॉ आणि इशान क्रिशन हेही जाहिरातीच्या दुनियेत स्थिरावतायत. त्यांनी २०१७मध्ये पहिली जाहिरात केली. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र यात घसरण झालीये. लिओनेल मेस्सीचे टाटा मोटर्ससोबतचा २९१६मध्ये ६० कोटींचा करार संपुष्टात आला. याप्रमाणेच टायगर वुड्सनेही ५० कोटी रुपयांचा हीरो मोटोशी करार केला होता. तोही संपलाय. रिपोर्टनुसार, २०१७मध्ये खेळाच्या स्पॉन्सरशिपमध्ये १४.१ टक्क्यांची वाढ झाली. २०१७मध्ये जाहिरातीवर ६१,२६३ कोटी रुपये खर्च झाले.