इंग्लंड विरुद्ध सिरीज आधी कोहलीचं टेन्शन वाढलं

विराटला पडला मोठा प्रश्न...

Updated: Jul 2, 2018, 01:57 PM IST
इंग्लंड विरुद्ध सिरीज आधी कोहलीचं टेन्शन वाढलं title=

मुंबई : 3 जुलैपासून मॅनचेस्टरमध्ये इंग्लंड विरुद्ध 3 टी-20 सामन्यांच्या आधी विराट कोहलीपुढे एक संकट उभं राहिलं आहे. ओपनिंग कोणाकडून करायची असा प्रश्न कोहलीपुढे आहे. कारण ओपनिंगसाठी टीममध्ये 3 जण आहेत. एकीकडे जेथे टीमची रेग्यूलर ओपनिंग जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आयरलँड विरुद्ध धमाकेदार बॅटींग करत आपण दावेदारीत असल्याचं सिद्ध केलं आहे. दूसरीकडे केएल राहुल देखील फॉर्ममध्ये आहे. प्लेइंग इलेवनमध्ये दावा केला आहे. क्रिकेट एक्सपर्ट्सनुसार देखील केएल राहुल याने संघात आपली जागा पक्की केली आहे. केएल राहुल आयपीएल 2018 मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या नंबरवर होता.

केएल राहुलने आयपीएल 2018 मध्ये 14 सामन्यांमध्ये 54.91 च्या रनरेटने 659 रन केले आहेत. ज्यामध्ये 6 अर्धशतक आणि 66 रनची मोठी खेळी केली होती. आयपीएलमध्ये केएल राहुलचा स्ट्राईक रेट 158 वर होता. जर आयपीएलमध्ये रोहित शर्मा आणि धवनच्या कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर राहुलच्या पुढे कोणीच नाही टिकत. रोहित शर्मा आयपीएलच्या 14 सामन्यांमध्ये फक्त 286 रन करु शकला. धवनने रोहितला मागे टाकत 16 सामन्यांमध्ये 497 रन केले आहेत.

आयपीएलमध्ये रोहित शर्माची कामगिरी इतकी चांगली नव्हती पण आयरलँड विरुद्ध रोहित शर्माने दमदार 97 रन करत पुन्हा आपली जागा पक्की केली आहे. रोहितनेच नाही तर शिखर धवन आणि केएल राहुलने देखील आयरलँड विरुद्ध अर्धशतकीय खेळी करत कर्णधार विराट कोहलीला विचार करण्यासाठी मजबूर केलं आहे.

जर विराट केएल राहुलला संघात घेतो तर मग सुरेश रैनाला टीममधून बाहेर काढलं जावू शकतं. विराटला पण त्याचं स्थान बदलावं लागेल. पण रैनाला जर काढलं तर मग त्याच्यावर देखील अन्याय होईल. आयरलँडच्या विरुद्ध 2 सामन्यामध्ये रैनाने 79 रन केले. त्यामुळे विराट पुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.