२०२५ पर्यंतचे वर्ल्डकप जिंकणार विराट, पाहा कोणी केली ही भविष्यवाणी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या अनेक रेकॉर्ड्स मोडत आहेत. टेस्ट क्रिकेट असो की वनडे किंवा मग टी20 सर्व फॉरमॅटमध्ये विराटचा बोलबाला आहे. 

shailesh musale Updated: Mar 12, 2018, 08:31 PM IST
२०२५ पर्यंतचे वर्ल्डकप जिंकणार विराट, पाहा कोणी केली ही भविष्यवाणी title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या अनेक रेकॉर्ड्स मोडत आहेत. टेस्ट क्रिकेट असो की वनडे किंवा मग टी20 सर्व फॉरमॅटमध्ये विराटचा बोलबाला आहे. 

विराट घडवणार इतिहास

अनेक दिग्गजांचं असं मत आहे की विराट लवकरच क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिनचा १०० शतकांचा रेकॉर्ड मोडेल. यातच आता क्रिकेटबाबत अचूक अशी भविष्यवाणी करणारे प्रसिद्ध ज्योतीष नरेंद्र बुंदे यांनी म्हटलं आहे की, भारतीय टीम कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात २०१८ आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नवे मानदंड तयार करणार आहे.

काय केली भविष्यवाणी

जेव्हा लोकं धोनीच्या स्थानावर प्रश्न उपस्थित करत होते तेव्हा नागपूरच्या या ज्योतिषांनी म्हटलं होतं की, धोनी इंग्लंडमधील २०१९ चा वर्ल्डकप खेळतील. आता त्यांची भविष्यवाणी अशी आहे की, कोहली २०२५ पर्यंत टी-20 आणि वनडे वर्ल्डकप विजेता बनत सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांचा रेकॉर्ड देखील मोडेल.