VIDEO : शुभमन गिलचा हा जबरदस्त कॅच बघितलात का?

मनजोत कालरानं केलेल्या शतकाच्या जोरावर भारतानं अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सनं हरवलं.

Updated: Feb 4, 2018, 04:42 PM IST
VIDEO : शुभमन गिलचा हा जबरदस्त कॅच बघितलात का?  title=

मुंबई : मनजोत कालरानं केलेल्या शतकाच्या जोरावर भारतानं अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सनं हरवलं. फायनलमधल्या या शतकी खेळीमुळे मनजोतला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. तर स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला मॅन ऑफ द सीरिज देण्यात आलं.

अंडर १९ वर्ल्ड कपच्या सगळ्याच मॅचमध्ये शुभमनची बॅट जोरदार चालली. बॅटिंगच नाही तर फिल्डिंगमध्येही शुभमननं चपळता दाखवली. पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शुभमननं शतक मारलं. शुभमननं या शतकाबरोबरच मॅचमध्ये दोन कॅच पकडले. यातल्या एका कॅचनं क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. शुभमनच्या या कामगिरीमुळे भारतानं सेमी फायनलमध्ये पाकिस्तानचा तब्बल २०३ रन्सनं पराभव केला. पाकिस्तानचा कॅप्टन हसन खानचा हा कॅच शुभमन गिलनं पकडला. या मॅचमध्ये हसन खान ५ रन्स करून आऊट झाला.