Shikhar Dhawan: कॅप्टन्स फोटोशूटदरम्यान शिखर धवन का होता गैरहजर; अखेर खुलासा झालाच!

Shikhar Dhawan: चेन्नईने प्रसिद्धीपत्रक जारी करत ऋतुराज गायकवाड आगामी हंगामात कर्णधार असेल याची अधिकृत माहिती दिलीये. आयपीएलच्या ट्विटर हँडलवर सर्व टीमच्या कर्णधारांचा ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करण्यात आले आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 21, 2024, 06:36 PM IST
Shikhar Dhawan: कॅप्टन्स फोटोशूटदरम्यान शिखर धवन का होता गैरहजर; अखेर खुलासा झालाच! title=

Shikhar Dhawan: उद्यापासून भारतात आयपीएलला सुरवात होणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. नुकतंच सर्व कॅप्टन्सचं आयपीएलच्या ट्रॉफीसोबत फोटो शूट कऱण्यात आलं. यावेळी धोनीच्या चाहत्यांच्या एक मोठा धक्का बसला. कॅप्टन म्हणून धोनी नाही तर ऋतुराज गायकवाड उभा होता. धोनीने चेन्नईच्या कॅप्टन्सीची धुरा ऋतुराज गायडवाडकडे सोपवली. याशिवया या फोटोशूटमध्ये पंजाबकडून शिखर धवन नाही तर जितेश शर्मा असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

चेन्नईने प्रसिद्धीपत्रक जारी करत ऋतुराज गायकवाड आगामी हंगामात कर्णधार असेल याची अधिकृत माहिती दिलीये. आयपीएलच्या ट्विटर हँडलवर सर्व टीमच्या कर्णधारांचा ट्रॉफीसोबतचा फोटो शेअर करण्यात आले आहेत. मात्र पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन या फोटोमध्ये दिसला नाही. दरम्यान अशातच गब्बरकडून कर्णधारपद काढून घेतलं का? असाल सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. 

फोटोशूट दरम्यान का नव्हता शिखर धवन?

मिळालेल्या माहितीनुसार, जितेश शर्मा आता अधिकृतपणे या सिझनसाठी पंजाब किंग्जचा उपकर्णधार असणार आहे. शिखर धवनची काहीसा आजारी आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यावेळी त्याची तब्येत सुधारेल अशी आशा व्यक्त करण्यात येते.

दरम्यान यावरून शिखर धवनची तब्येत बरी नाही. त्यामुळे आयपीएलच्या फोटोशूटासाठी तो उपलब्ध नसल्याचा अंदाज बांधण्यात येतोय. 

जितेश शर्मा आहे उप-कर्णधार

जितेश शर्माला आगामी 17 व्या सिझनसाठी पंजाब किंग्जचा उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. गेल्या सिझनमध्ये जितेशने त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. यानंतर जितेशला टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली. अशा परिस्थितीत पंजाब किंग्जच्या टीम मॅनेजमेंटनेही त्याच्यावर विश्वास व्यक्त करत उपकर्णधारपदी नियुक्ती केली.

आयपीएल 2024 साठी पंजाब किंग्जची संपूर्ण टीम 

शिखर धवन ( कर्णधार ), जितेश शर्मा ( उप कर्णधार ), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, राहुल चहर, गुरनूर ब्रार, विद्वथ कावरप्पा, सॅम कुरन, सिकंदर रझा, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, शशांक सिंग, विश्वनाथ प्रताप सिंग, तनय थियागराजन, प्रिन्स चौधरी, रिले रौसो.