रोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही? स्वत: केला खुलासा, म्हणतो 'आमचं ठरलंय...'

Indian captain in T20 World Cup 2024 : जेव्हा मोठ्या स्पर्धेसाठी टीम जाहीर करायची असते, तेव्हा काही खेळाडूंना वगळावं लागतं. त्यामुळे अनेक खेळाडू निराश नक्कीच असतील. मात्र, आमचं काम संघात स्पष्टता आणणं आहे, असं रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणतो.

सौरभ तळेकर | Updated: Jan 19, 2024, 03:34 PM IST
रोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही? स्वत: केला खुलासा, म्हणतो 'आमचं ठरलंय...' title=
Rohit Sharma, team india captain in T20 World Cup 2024

Rohit Sharma, T20 World Cup 2024 : गेल्या वर्षभरापासून टी-ट्वेंटी क्रिकेटपासून लांब असलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी अफगाणिस्तानविरुद्ध पुनरागमन केलं. कॅप्टन रोहित शर्माने वर्षभराची कसर काढली अन् धमाकेदार शतक ठोकलं. त्याचबरोबर आता रोहित शर्माच आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) टीम इंडियाचा कर्णधार असेल यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झालंय. अशातच आता रोहित शर्माने स्वत: जिओ सिनेमावर बोलताना स्पष्ट संकेत दिले आहेत.

काय म्हणाला Rohit Sharma ?

आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये काही आश्वासक खेळाडू बाहेर बसतील आणि व्यवसायिक खेळाडूंचा ते भाग असतील. आम्ही जेव्हा वनडे वर्ल्ड कप खेळत होतो, तेव्हा आम्ही काही टी-ट्वेंटी खेळाडूंना आजमावलं होतं. त्यापैकी अनेकांनी चांगली कामगिरी केली.  पण जेव्हा मोठ्या स्पर्धेसाठी टीम जाहीर करायची असते, तेव्हा काही खेळाडूंना वगळावं लागतं. त्यामुळे अनेक खेळाडू निराश नक्कीच असतील. मात्र, आमचं काम संघात स्पष्टता आणणं आहे. आगामी वर्ल्ड कपसाठी आमच्याकडे 25 ते 30 खेळाडू आहेत, असं रोहित शर्मा याने म्हटलं आहे.

ज्या खेळाडूंवर आमच्या नजरा आहेत, त्यांच्याकडून कशा प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा आहे, याबद्दल त्यांना माहितीये.. आम्ही अद्याप टी-ट्वेंटी संघ निश्चित केला नाही. परंतू माझ्या मनात 8 ते 10 खेळाडू आहेत, जे टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार आहेत, असं रोहित शर्मा याने जिओ सिनेमाशी बोलताना स्पष्ट केलंय. त्यामुळे आता रोहित शर्माच आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा म्होरक्या असेल, हे आता स्पष्ट झालं आहे. 

वेस्ट इंडिजची खेळपट्टी इतर देशांपेशा वेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला संघ निवडताना त्याप्रकारे विचार करावा लागतो. कोणत्या खेळाडूला खेळवावं, याचा विचार करावा लागतो. त्यामुळे आम्ही तर संघात स्पष्टता राखण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, कॅप्टन म्हणून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की, तुम्ही सर्वांना आनंदी ठेऊ शकत नाही. तुम्हाला संघाच्या गरजांवर लक्ष द्यावं लागतं, असं म्हणत रोहित शर्माने संजू सॅमसन आणि युझी चहल यांना खेळ खल्लास झाल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून मी टी-ट्वेंटी क्रिकेट खेळलो नाही. मी नेटमध्ये खूप सराव केला. गोलंदाजांवर प्रेशर टाकण्यासाठी तुम्हाला फटकेबाजी करावी लागते. जर बॉल फिरत असेल तर तुम्हाला सरळ फटका मारता येत नसेल तर काही प्रयोग करावे लागतात. मी स्विप आणि रिव्हर्स स्विप खेळण्याचा प्रयत्न केला. आता कितपत पर्याय वापरायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे, असंही रोहित शर्मा म्हणतो.