World Cup 2019: टीम इंडियाला सरावाची शेवटची संधी, बांगलादेशसोबत मुकाबला

५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून सुरुवात होत आहे. 

Updated: May 27, 2019, 06:42 PM IST
World Cup 2019: टीम इंडियाला सरावाची शेवटची संधी, बांगलादेशसोबत मुकाबला title=

कार्डिफ : ५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून सुरुवात होत आहे. त्याआधी भारतीय टीमला सरावाची शेवटची संधी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अभ्यास मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. यानंतर आता भारताचा दुसरा सराव सामना बांगलादेशविरुद्ध मंगळवारी होणार आहे. सोफिया गार्ड्स मैदानात हा सामना खेळवण्यात येईल. बांगलादेशला अजून एकही सराव सामना खेळता आला नाही. त्यांचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये भारताचा दारुण पराभव झाला होता. यामुळे भारतीय टीमच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित झाले होते. ट्रेन्ट बोल्टच्या स्विंगपुढे भारतीय बॅट्समननी लोटांगण घातलं होतं. रवींद्र जडेजानं अर्धशतक करून भारताचा स्कोअर १५० च्या पुढे पोहोचवला.

बांगलादेशची बॉलिंग न्यूझीलंडसारखी नसली तरी या टीममध्ये मोठे उलटफेर करण्याची क्षमता आहे. बांगलादेशविरुद्ध पराभव झाला, तर मात्र भारताचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा

बांगलादेशची टीम

मशरफे मुर्तजा (कर्णधार), तमीम इकबाल, सौम्य सरकार, सब्बीर अहमद, मोहम्मद मिथुन, रुबेल हुसैन, मुस्तफिजूर रहमान, अबू जायेद, महमदुल्लाह, मोहम्मद सैफउद्दीन, मेहदी हसन, मोसादेक हुसैन, शाकिब अल हसन, लिटन दास, मुशफिकुर रहीम