WTC 2021: पिचवर कचरा टाकून न्यूझीलंडच्या खेळाडूंचा सराव, धक्कादायक कारण समोर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघाची तयारी, फलंदाजाचा कचऱ्यामध्ये सराव

Updated: May 14, 2021, 02:24 PM IST
WTC 2021: पिचवर कचरा टाकून न्यूझीलंडच्या खेळाडूंचा सराव, धक्कादायक कारण समोर title=

मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आपला फज्जा उडू नये म्हणून न्यूझीलंड संघ कसून सराव करत आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार न्यूझीलंड संघाने आपल्या पिचवर कचरा टाकून सराव करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यावेळी गोलंदाजांनाही आपली नवीन ट्रीक वापरावी लागणार आहे. 

न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवे भारतीय स्पिनर्ससोबत खेळणं आणखी सोपं व्हावं यासाठी आपल्या पिचवर कचरा टाकून सराव करत आहे. कॉनवे न्यूझीलंड संघातून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी खेळणार आहे. 

18 ते 22 जून दरम्यान साउथेम्प्टम इथे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने देखील कंबर कसली आहे. आपल्या वेगवेगळ्या टॅकटिक्स आणि टेकनिक्स वापरून संघाला जिंकवून देण्याचा पूरेपूर प्रयत्न असणार आहे. 

29वर्षीय कॉनवे डाव्या हाताचा फलंदाज आहे. पिचवर कचरा टाकून सराव केला तर स्पिनर्ससोबत खेळणं आणखी सोपं होऊ शकतं असं कॉनवेचं म्हणणं आहे. विशेषत: साउथॅम्प्टनमध्ये जर फूटमार्कच्या खुणाांमुळे चेंडू फिरला तर तशा पद्धतीनं खेळण्याचा सराव असेल. 

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये कोणकोण असणार?

रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधारन), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, के एल राहुल, ऋद्धिमान साहा. टीम इंडियाच्या निवडीदरम्यान  ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान अर्झन नगवासवाला या खेळाडूंना स्टॅडबायसाठी ठेवलं आहे.