VIDEO : युवराजच्या ‘त्या’ गोष्टीने बिग बींचे डोळेही पाणावले

अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘कौन बनेगा करोडपती’च्या ९व्या सीझनचा नुकताच शेवट झाला. २ महिने चाललेल्या या शोचा ७ नोव्हेंबरला शेवटचा टेलिव्हिजनवर दाखवला गेलाय.

Updated: Nov 6, 2017, 04:37 PM IST
VIDEO : युवराजच्या ‘त्या’ गोष्टीने बिग बींचे डोळेही पाणावले  title=

मुंबई : अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध ‘कौन बनेगा करोडपती’च्या ९व्या सीझनचा नुकताच शेवट झाला. २ महिने चाललेल्या या शोचा ७ नोव्हेंबरला शेवटचा टेलिव्हिजनवर दाखवला गेलाय.

या शोचा शेवटचा एपिसोड दोन दिवस चालणार आहे. या एपिसोडमध्ये बॉलिवूड कलाकारांसोबत अजूनही प्रसिद्ध व्यक्ती येतील. क्रिकेटर युवराज सिंह आणि अभिनेत्री विद्या बालन ६ नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये दिसतील. 

युवराज सिंह याने या एपिसोडमध्ये त्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी अमिताभ बच्चन यांना सांगितल्या. या एपिसोडचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आलाय. यात युवराज फारच इमोशनल झाल्याचे दिसते आहे. युवराज बोलताना रडायलाही लागला. त्याला रडताना पाहून अमिताभ बच्चन यांचेही डोळे पाणावले. 

युवराज सिंह त्याच्या कॅन्सर या आजाराबद्दल बोलत होता. २०११ च्या वर्ल्डकप दरम्यान त्याची तब्येत खूप जास्त बिघडली होती. तेव्हा त्याला डॉक्टरने तू वेळेत उपचार केले नाहीस तर वाचू शकणार नाही, असे तो म्हणाला. त्याने सांगितले की, त्याच्या शरिरातून १४ सेंटीमीटरचा ट्यूमर काढण्यात आलाय.